Chhagan Bhujbal Agrowon
ॲग्रो विशेष

Manjarpada Project : येवल्याची तहान भागवून वैजापूर, संभाजीनगरला पाणी देणार

Water Supply : मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नाही, तर पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र.३ व ४ च्या माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी. एम. सी. पाणी लिफ्ट करुन मांजरपाडामध्ये आणणार आहोत.

हे पाणी पूणेगांव-दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची तहान भागून वैजापूर, संभाजीनगरला सुद्धा पाणी देणार, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

शनिवारी (ता. ३१) रोजी मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचे जलपूजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, रवींद्र पगार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, सविता पवार, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अरुण थोरात, प्रेरणा बलकवडे,वसंतराव पवार उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, की या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवालसुद्धा तयार झालेला आहे. मेरीच्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या मान्यतेनंतर हा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी येणार आहे. आगामी काळात दरसवाडी बंधाऱ्याची क्षमता सुद्धा वाढवणार आहोत. पुणेगांवमध्ये आणखीनही कुठून पाणी शकतो याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव आणि नरहरी झिरवाळांसोबत चर्चा सुद्धा झाली आहे. पुणेगाव व दरसवाडी

भरल्यानंतर पाणी येवल्यात

२००६ साली झालेला कालवा २०१९ पर्यंत पडीक असल्याने अनेक अडचणी होत्या, कालव्याची दुरवस्था झालेली होती. यासंदर्भात तज्ज्ञ मंडळी व प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर कालव्याचे नव्याने विस्तारीकरण व अस्तरीकरण करण्याची गरज समोर आली. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काँक्रिटीकरण व अस्तरीकरणासाठी २४२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला.

या कामाला तत्काळ सुरवात करण्यात आली. काम वेगाने होण्यासाठी कालव्यावर प्रत्येक २० किमी अंतरावर आधुनिक यंत्रांद्वारे काम हे काम सुरू होते. या अथक प्रयत्नानंतर दीड वर्षांची मुदत असलेले हे काम अवघ्या ६ महिन्यांत जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. मांजरपाडा पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरवात झाली आहे. बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आवक सुरू झाली. पुणेगाव व दरसवाडी धरण भरून पाणी येवल्याच्या हद्दीत दाखल झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT