Manjarpada Water Project : अखेर मांजरपाड्याचे पाणी पोहोचले येवल्यात

Agriculture Irrigation : येवल्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा देवसाने हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे.
Manjarpada Project
Manjarpada ProjectAgrowon
Published on
Updated on

Nashik News : दरसवाडी पुणेगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून बुधवारी (ता. २७) येवला तालुक्यातील कातरणी येथे पाणी पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत पाण्याचे पूजन करण्यात आले. या वेळी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.

येवल्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा देवसाने हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातून येणारे पाणी येवल्याला पोहोचविण्यासाठी संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. दरसवाडी धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडल्यानंतर केवळ १५ तासांत बुधवारी (ता. २७) पाणी येवला तालुक्यातील कातरणी शिवारात पोहोचले.

Manjarpada Project
Water Projects : मोठ्या अकरा प्रकल्पांतील साठा १५० टीएमसीवर

पाणी कातरणी शिवारात पोहोचताच तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याने शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते स्थानिक गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले.

Manjarpada Project
Water Project : खानदेशातील काही प्रकल्पांत कमी जलसाठा

या वेळी एकमेकांना पेढे भरवत शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच शेतकऱ्यांनी या वेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष आभार मानले.

या वेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, पाणी आंदोलक मोहन शेलार, दत्ता निकम, अलकेश कासलीवाल, एल. जी. कदम, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, तुळशीराम कोकाटे, मकरंद सोनवणे, शिवाजी कदम, समाधान कदम, पप्पू सोनवणे, दीपक कदम, प्रवीण कदम, दत्तू लभडे, गोकुळ शिंदे, सचिन कदम, बापू सोनवणे, विनायक कदम, नामदेव पगार, विठ्ठल कदम, भगवान ठोंबरे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विजय जेजुरकर, कैलास जेजूरकर, नवनाथ थोरात, दीपक गायकवाड, दीपक पवार, संदीप कदम, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, मंगेश जाधव, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com