Bhatghar Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

Water Crisis : भाटघर धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने समितीने २० एप्रिलला धरणातील पाण्याचा विसर्ग बंद केला होता.

Team Agrowon

Pune News : पाटबंधारे विभागाने भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता.९) सुरू केला होता. मात्र, धरण भागातील ४२ गावांत पाणीटंचाई असल्याने भाटघर धरण पुनर्वसन समितीने केलेल्या आंदोलनाची दखल घेत धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग बंद केला. यामुळे भाटघर धरण पुनर्वसन समितीच्या आंदोलनाला यश आले आहे.

भाटघर धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने समितीने २० एप्रिलला धरणातील पाण्याचा विसर्ग बंद केला होता. मात्र, पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ९ मे रोजी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडले होते.

मात्र, भाटघर धरण पुनर्वसन समितीच्या वतीने धरणावर जाऊन पाण्याचा विसर्ग बंद केला. या वेळी विठ्ठल वरखडे, सोमनाथ वचकल काळुराम मळेकर, नितीन बांदल, सचिन बांदल, अंकुश खंडाळे, महेश टापरे, आत्माराम धुमाळ, भाऊ मळेकर उपस्थित होते. सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील विहिरी कोरड्या पडल्या असून, धरण भागातील वेळवंड आणि भुतोंडे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे भाटघर धरण पुनर्वसन समितीच्या वतीने भाटघर धरणातील पाणीसाठा बंद केला आहे. पुनर्वसन समिती समवेत बैठक घेऊन ४२ गावांतील नागरिकांना पिण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे पाटबंधारे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी आश्वासन दिल्याचे समितीच्या वतीने विठ्ठल वरखडे व सोमनाथ वचकल यांनी सांगितले.

४२ गावे अन्पा णी फक्त १० टक्के

भाटघर धरणाच्या पाण्यावर सुमारे ४२ गावांतील पिण्याच्या पाण्याच्या नळपाणीपुरवठा योजना आणि भोर शहरातील पाणीपुरवठा अवलंबून आहे. धरणात फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून पावसाळा सुरू होण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Farmer: देशातील ३ कोटी पशुपालक दूध विकत नाहीत!

Fruit and Vegetable Storage: फळे आणि भाज्या साठवण्याच्या प्रभावी पद्धती

Ashok Kumar Singh Padma Shri: बासमतीला दिला अनोखा सुगंध, शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलं, कोण आहेत अशोक कुमार सिंह?, ज्यांचा 'पद्मश्री'नं सन्मान

Weekly Weather: किमान, कमाल तापमानात अल्पशी वाढ शक्य

Sugarcane Season: यंदाचा ऊस हंगाम कारखानदारांसाठी ‘टी-२०’

SCROLL FOR NEXT