डॉ. सुरेंद्र पाटील, प्रशांत देबाजेIndian Agriculture: कागदी लिंबाच्या तीन बहरांपैकी फक्त हस्त बहरातील फळे उन्हाळ्यात उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे झाडावर हस्त बहर जास्तीत जास्त येण्याची आवश्यकता असते. हस्त बहरातील १५ टक्के फुलधारणा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत होते. या बहराची फळे मार्च ते मे महिन्यात काढणीस येतात. हस्त बहराच्या फळांना आंबिया बहराच्या फळांपेक्षा ६ ते ८ पट आणि मृग बहराच्या फळांपेक्षा ३ ते ४ पट भाव मिळतो. म्हणून हस्त बहर घेणे अधिक फायदेशीर ठरते. मात्र हा बहर सहज घेता येत नाही..कारण सप्टेंबर-ऑक्टोबर पूर्वी पावसाळा असल्याने झाडांना अपेक्षित ताण बसत नाही. म्हणून हस्त बहर घेण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून फळबागेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. यात मशागत, खत- पाणी व्यवस्थापन तसेच संजीवकांचा योग्य वापर करून हस्त बहराची हमखास फुलधारण होण्यासाठी आतापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्याकरिता झाडांची वाढ करणारी अन्नद्रव्ये (कर्ब-नत्र) वाढीकरिता खर्च न होता, अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी आहे. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यानंतर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात..Orchard Farming : सांगली जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्र एक लाख एकर.हस्त बहराचे नियोजनलिंबू झाडावर मृग बहराची फळे नसावीत. याकरिता झाडाला मृग बहर न येण्याची सवय लावणे जरुरी आहे. असे केल्यामुळे मृग बहराची फळधारणा होणार नाही किंवा कमी प्रमाणात होऊन नियमित हस्त बहर येत राहील. जिब्रेलिक ॲसिड या संजीवकाच्या वापरामुळे मृग बहर फुटण्यास प्रतिरोध होऊन मृग बहरात फुलधारणेऐवजी झाडाची शाखीय वाढ होते. मृग बहराची फुले उशिरा म्हणजे जून-जुलै ऐवजी, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत म्हणजेच हस्त बहरात फुटण्यास मदत होईल. याकरिता जून महिन्यात जिब्रेलिक ॲसिड (५० पीपीएम) ५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यायला हवी..ताणामुळे झाडाला विश्रांती मिळते. त्यामुळे झाडे सुप्त अवस्थेत जातात. या कालावधीत झाडामध्ये कर्ब-नत्र संचय होतो. यासाठी १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पाण्याचा ताण द्यावा. ताण कालावधीत पाऊस येत असल्याने अपेक्षित ताण बसत नाही. यासाठी १५ सप्टेंबर दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराइड १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस) आवश्यकतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी हीच फवारणी करावी. क्लोरमेक्वाट क्लोराइड हे संजीवक जिब्रेलिक आम्लाचे प्रमाण कमी करते. त्यामुळे झाडाच्या आंतरिक घडामोडीचा वेग कमी होऊन झाडे सुप्त अवस्थेत जातात, कायिक वाढ मंदावते. कर्ब- नत्र गुणोत्तर यांचा योग्य प्रमाणात संचय होतो..अन्नद्रव्यांचे व्यवस्थापनहस्त बहराचे नियोजन केल्यावर झाडावर हंगाम नसताना देखील फळांची संख्या अधिक राखली जाते. यामुळे झाडांची होणारी झीज भरून काढणे, झाडांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी योग्य वेळी अन्नद्रव्यांच्या योग्य मात्रेचे नियोजन करावे.सहा वर्षे व त्यावरील झाडाकरिता शेणखत ४० किलो आणि नत्र ६०० ग्रॅम आणि स्फुरद व पालाश प्रत्येकी ३०० ग्रॅम प्रति झाड प्रमाणे द्यावे.जुलै महिन्यात प्रति झाड ४० किलो शेणखत आणि त्याबरोबर ७.५ किलो निंबोळी ढेप द्यावी. पावसामुळे शेणखत जमिनीत चांगले कुजते. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. पाण्याचा ताण तोडताना, प्रति झाड ३०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश द्यावे. उरलेली नत्राची ३०० ग्रॅम मात्रा फुले आल्यापासून साधारणपणे एक महिन्याने द्यावी. हा काळ फळांच्या वाढीचा असल्यामुळे झाडाची नत्राची गरज वाढते. .Orchard Nutrient Management : फळपिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे.स्फुरद व पालाशची अतिरिक्त गरज पालाशची मात्रा अगोदर देऊनही मातीद्वारे उशिरा उपलब्ध होत असल्याने या कालावधीत आवश्यकतेनुसार पूर्ण होते. ताण दिल्यानंतर बहर येण्याकरिता व फुलगळ रोखण्याकरिता अन्नद्रव्यांची त्वरित उपलब्धता होणे आवश्यक असते.मातीतून दिलेली अन्नद्रव्ये झाडांना त्वरित उपलब्ध होत नाही. याकरिता ऑक्टोबर महिन्यात ताण तोडताना १० ग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे नत्र व पालाशची आवश्यकता त्वरित पूर्ण करता येते.फुलधारणेच्या काळात झाडाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्यतः झिंक व बोरॉन यांची उपलब्धता योग्य प्रमाणात असल्यास अपेक्षित परिणाम होतो. फूल गळण्यावर नियंत्रण मिळते. याकरिता झिंक पाच ग्रॅम आणि बोरॉन तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ताण तोडताना माती परीक्षणानुसार चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.फुलधारणेच्या काळात झाडांस आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मुख्यतः झिंक आणि बोरॉन यांची उपलब्धता योग्य प्रमाणात केल्यास फुलधारणा होऊन फुलगळतीवर नियंत्रण मिळण्यास मदत होते..बागेचे व्यवस्थापनवाफ्यातील ओलावा टिकविण्याकरिता ५ सेंमी जाडीचा वाळलेल्या गवताचा थर द्यावा. त्यामुळे जमिनीचे तापमान संतुलित राहून प्रत्येक महिन्याला एका पाण्याच्या पाळीची बचत होते. पावसाळ्यापूर्वी आणि नंतर झाडाच्या बुंध्याला २ ते ३ फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.कँकर किंवा खैऱ्या रोग नियंत्रणकॉपर ऑक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार करून जून ते सप्टेंबर या कालावधीत ३० दिवसांचे अंतराने फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी..ओलित व्यवस्थापनठिबक सिंचन पद्धतीत पाण्याची ३० टक्के बचत होऊन फळांची प्रत उत्तम मिळते. तसेच झाडावर सल सुद्धा कमी आढळून येते.दुहेरी आळे पद्धतीत पाण्याचा खोडाला संपर्क झाल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. बागेतील ओलावा ४० टक्के झाल्यावर ओलित केल्यास फळांची प्रत उत्तम राहून उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना बाष्पोउत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी व शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के खते (४८० ग्रॅम नत्र, २४० ग्रॅम स्फुरद आणि २४० ग्रॅम पालाश प्रति झाड) दिल्यास फळे मोठ्या आकाराची व दर्जेदार मिळून उत्पादनात चांगली वाढ मिळते.वरील प्रमाणे नियोजन आणि संजीवकांचा वापर करून हस्त बहराचे उत्पादन घेता येईल..हस्त बहराकरिता ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्ये व पाणी नियोजन (दहा वर्षे आणि त्यावरील झाडांकरिता)महिना पाणी (लिटर /दिवस /झाड) खते (ग्रॅम/झाड) नत्र स्फुरद पालाशजानेवारी ५२ ९६ ४८ ४८फेब्रुवारी ७२ ४८ २४ ४८मार्च १०५ ०० ०० ००एप्रिल १४४ ०० ०० ००मे १७८ ०० ०० ००जून १२१ ०० ०० ००जुलै ६१ ०० ०० ००ऑगस्ट ४८ ०० ०० ००सप्टेंबर ताण कालावधी १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंतऑक्टोबर ५८ १२० ६० ४८नोव्हेंबर ५३ १२० ६० ४८डिसेंबर ४६ ९६ ४८ ४८ ४८० २४० २४०- डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७ ३५३५३(फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.