Water Scarcity : खानदेशात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतीच

Water Issue : खानदेशात टंचाईग्रस्त गावांची संख्या दर आठवड्याला वाढतच आहे.
Water Issue
Water IssueAgrowon

Jalgaon News : खानदेशात टंचाईग्रस्त गावांची संख्या दर आठवड्याला वाढतच आहे. गावोगावी सार्वजनिक जलस्रोत आटत असून, टंचाईची समस्या गंभीर बनत आहे. धुळ्यासह नंदुरबारात मिळून १०० पेक्षा अधिक गावे टंचाईग्रस्त आहेत.

जळगाव जिल्ह्यात ७० गावांत टंचाई आहे. धुळ्यात सुमारे ५५ व नंदुरबारातही सुमारे ५१ गावांत टंचाई आहे. काही गावांत टंचाई आहे, पण त्यात टंचाईच्या योजना लागू झालेल्या नाहीत. यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी दिसत नाही.

Water Issue
Water Issue : पाणी घटल्याने ‘उजनी’वरील योजना बंद पडण्याची शक्यता

जळगाव जिल्ह्यात सद्यःस्थितीत ८९ टँकर सुरू आहेत. यात सतत वाढ झाली आहे. पूर्वी सुमारे ५४ गावांत टंचाई होती. आता टंचाईग्रस्त गावे ७० आहेत. जळगाव जिल्ह्यात जामनेर, एरंडोल, धरणगाव, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा, चोपडा या भागात टंचाई अधिक आहे. जामनेरात १० विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

धरणगावातही १३ विहिरी अधिग्रहित आहेत. धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे या भागात टंचाई तीव्र झाली आहे. नंदुरबारात नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, अक्राणी तालुक्यात टंचाई आहे.

Water Issue
Water Scarcity : भाजीपाल्याची वाढ खुंटली; नवीन बागा वाळल्या

सातपुड्यात खानदेशात सर्वत्र समस्या आहे. या भागात पाऊसमान चांगले होते. सातपुड्यातील अनेक प्रकल्प जळगाव, धुळे भागात १०० टक्के भरले होते. परंतु पावसाचे पाणी अन्य भागात वाहून गेले. ते साठविण्याची मोठी व्यवस्था सर्वत्र नाही.

भूगर्भात पाणी जिरत नाही. यामुळे टंचाई आहे. जळगावातील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, अक्कलकुवा, अक्राणी भागांत सातपुडा पर्वत क्षेत्र आहे. या भागात टंचाईग्रस्त पाडे व लहान गावे आहेत. उन्हाची तीव्रता वाढली, तशी टंचाईदेखील वाढली आहे. अनेक लहान तलावही आटले आहेत. या महिन्याच्या अखेरीस ही समस्या आणखी वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com