Crop Insurance Issue: राज्यात १५ ऑगस्टदरम्यान चार दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पुरती दैना झाली आहे. शहरे पाण्याने तुंबली आहेत तर ग्रामीण भाग खरडून गेला आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देणारी विमा योजना ही पोकळ असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होऊन शेतकरी उघड्यावर पडला आहे.