Sangli News: सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर आला. या पुरामुळे कृष्णा आणि वारणा काठची पिके पाण्यात बुडली आहेत. कृषी विभागाने एक ऑगस्ट ते २० ऑगस्टदरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे नजर अंदाज अहवाल तयार केले आहेत. .यात चार तालुक्यांतील २८६७ हेक्टर म्हणजे सात हजार १६७.५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची आकडेवारी आहे.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचे पाणी पिकात साचून राहिले आहे. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार तालुक्यांतील नदीकाठच्या पिकांना फटका बसला आहे..Rain Crop Damage : लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त गावांतील नुकसानीची पाहणी .कृषी विभागाने एक ऑगस्ट ते २० ऑगस्ट या दरम्यान, झालेल्या पावसामुळे कोण कोणत्या तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे, याचे सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार तालुक्यांतील ९९ गावांमधील ७३२० शेतकऱ्यांचे बागायती २८२०, तर फळपिके ४७ हेक्टर असे एकूण २८६७ हेक्टरवरील पिकांचे नजर अंदाजे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, भुईमूग, मका आणि पालेभाज्या बाधित झाले आहे..Maharashtra Crop Loss: राज्यात ८ लाख ५१ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान.दरम्यान, वारणा आणि कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी केला असला, तरी अजूनही कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी शेतातच आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. अर्थात यंदाच्या पुरामुळे नदीकाठची पिके शेतकऱ्यांच्या हाती लागणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे..तालुकानिहाय पावसामुळे नजर अंदाजे झालेले पिकांचे नुकसानतालुका शेतकरी संख्या गावाची संख्या क्षेत्र (हेक्टर)मिरज १६६७ १६ १११२वाळवा ३६२३ ३८ १२७५शिराळा १७१० २८ ३७०पलूस ३२० १७ ११०एकूण ७३२० ९९ २८६७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.