Water Scarcity : गाव-वाड्यांवरील टँकरची संख्या दीड हजार पार

Water Issue : आत्ताच्या घडीला १५६३ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती भीषण बनली असून या टंचाईग्रस्त गाव, वाड्यांना १६५८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : निव्वळ टँकरवर तहान भागविण्याची वेळ आलेल्या मराठवाड्यातील गाव-वाड्यांची संख्या दीड हजार पार झाली आहे. आत्ताच्या घडीला १५६३ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती भीषण बनली असून या टंचाईग्रस्त गाव, वाड्यांना १६५८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

यंदा मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग गडद झाले आहेत. पावसाळ्यात कमी पडलेला पाऊस पाण्याच्या दुष्काळामागचे मोठे कारण मानले जात आहे. मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला असून भूजल साठाही कमालीचा घटला आहे. कोरड्या पडलेल्या प्रकल्पांनी पाण्याच संकट भीषण केले असून येणारा पावसाळा लांबल्यास मराठवाडा भीषण जल संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Water Scarcity
Water Scarcity : खानदेशात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतीच

आत्ताच्या घडीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या ४०० पार गेली आहे. जालन्यातही टंचाईग्रस्त गाववाड्याच्या संख्येने जवळपास ४०० चा टप्पा गाठला आहे. बीड जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त गाव-वाड्यांना भीषण जल संकटाचा सामना करावा लागतो आहे. टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील सर्व गाव-वाड्यांसाठी प्रशासनाकडून १६५८ टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये २१ शासकीय, तर तब्बल १६३७ खासगी टँकरचा समावेश आहे.

२,४८३ खासगी विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २४८३ विहिरींचे टॅंकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहीत केलेल्या विहिरींची सर्वाधिक ७३५ संख्या धाराशिव जिल्ह्यात असून त्या पाठोपाठ जालन्यात ४५१, बीडमध्ये ३७९, छत्रपती संभाजी नगरमध्ये ३४०, लातूरमध्ये २८२, नांदेडमध्ये १४१, परभणीत ८०, हिंगोलीत ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Water Scarcity
Water Stock : पाटगाव प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद आदी तालुक्यांत अनुक्रमे टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी, जालना, जाफराबाद, मंठा या तालुक्यांमध्ये अनुक्रमे टंचाई स्थिती भीषण होत चालली आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, माहूर या तालुक्यांमध्ये टंचाईने डोके वर काढले आहे. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी, केज, धारूर, परळी वैजनाथ, अंबाजोगाई आदी तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता भीषण तिकडे जाते आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम, कळंब वाशी, उमरगा, परंडा, लोहारा या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती तीव्र होत चालली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा व लातूरसह अहमदपूर, जळकोट, तालुक्यात पाणीटंचाईने अनुक्रमे डोकेवर काढले आहे.

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त

गाव, वाड्या व टँकरची संख्या

जिल्हा गाव वाड्या टँकर

छ.संभाजीनगर ४०० ६१ ६४८

जालना ३१९ ७४ ४६७

परभणी ०६ ०२ ०८

नांदेड ०३ १२ १५

बीड ३०८ २८२ ३८४

लातूर १६ ०४ १९

धाराशिव ७६ ०० ११७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com