Water Scarcity Action Plan Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पाणीसंकट गडद; प्रत्येक थेंब महत्त्वाचा

Water Scarcity : जलसंकट सध्या गडद होतेय, उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ३७ टक्क्यांवर आहे.

Team Agrowon

Solapur News : जलसंकट सध्या गडद होतेय, उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ३७ टक्क्यांवर आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून महापालिकेने धरण परिसरात एक कोटींचा खर्च करून दुबार पंपिंग सुरू केले आहे.

पण झपाट्याने खालावत असलेल्या पातळीमुळे उणे ५५ टक्क्यांवर तिबार पंपिंग सुरू करावे लागणार असून, त्यासाठी दोन कोटींचा खर्च आहे. यंदा पाऊस लांबल्यास धरणातील साठा उणे ६० टक्क्यांखाली गेल्यास सोलापूरचा पाणीपुरवठा दहा दिवसाआड होऊ शकतो, अशी चिंता अधिकारी व्यक्त करीत आहेत.

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण मदार उजनी धरणावरच अवलंबून आहे. याशिवाय इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत-जामखेड या नगरपालिकांसह १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनाही उजनीचाच आधार आहे. पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांसह औद्योगिक वसाहतींनाही उजनीतून पाणीपुरवठा होतो.

मात्र धरण उणे ६१ टक्के झाल्यानंतरधरणावरील ४७ पैकी बहुतेक पाणीपुरवठा योजना बंद पडतात. आतापर्यंत धरण २०१५-१६ मध्ये उणे ६० टक्क्यांपर्यंत खाली गेले होते, पण पाऊस कमी पडल्याने यंदा स्थिती चिंताजनक आहे.

धरणातील साठा उणे ६० ते ६५ टक्क्यांवर पोहोचल्यास कोट्यवधींचा खर्च करूनही सोलापूर महापालिकेला दहा दिवसाआड पाणी देता येणार नाही. नदीतून पाणी सोडता येणार नाही आणि जलवाहिनीतूनही पाणी उपसा करण्यास अडचणी येतील, अशी सद्य:स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्यातरी पाणी जपून वापरण्याचाच पर्याय नागरिकांकडे शिल्लक आहे.

सोलापूरसाठी तिबार पंपिंगनंतर पुढे काय?

उजनी धरण उणे ३५ टक्क्यांवर गेल्यानंतर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी एक ते सव्वा कोटीचा खर्च करून धरणात दुबार पंपिंग करावे लागते. सध्या दुबार पंपिंग सुरू झाले आहे. तर धरण उणे ५५ टक्के झाल्यावर दोन कोटींचा खर्च करून तिबार पंपिंग करावे लागते.

मात्र धरणातील पातळी उणे ५६ ते ६० टक्क्यांपर्यंत खाली गेल्यावर या पंपिंगचा काहीही उपयोग होत नाही. मात्र समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर धरण उणे ७० टक्के झाल्यानंतरही पंपिंग करणे शक्य होईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.

उजनीवर ४७ पाणीपुरवठा योजना

सोलापूर महापालिका, करमाळा, बार्शी-कुर्डुवाडी, इंदापूर, बारामती, धाराशिव, जामखेड नगरपालिका, व्होळे व २७ गावे, कव्हे व इतर १० गावे, जेऊर व २९ गावे, राशीन, ग्रामपंचायत अखोणी व २२ गावे, ग्रामपंचायत जिंती, ग्रामपंचायत केत्तूर नं. २, ग्रामपंचायत सावडी कोटी, ग्रामपंचायत भिगवण, ग्रामपंचायत शिरसोडी व दोन गावे, गागरगाव ग्रामपंचायत, देऊळगावराजा ग्रामपंचायत, श्री क्षेत्र सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक (कर्जत), इंदापूर, देवळाली, कर्जत, टेंभुर्णी, नीरा-नरसिंहपूर, धनस्मृती टेक्स्टाईल प्रा.लि. झरे, नेचर डिलाइट प्रा.लि. कळस, भैरवनाथ शुगर प्रा. लि. आलेगाव, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, वनगळी, एनटीपीसी (आहेरवाडी), रे-नगर (कुंभारी), हरनेश्‍वर ॲग्रो लि. कळस (इंदापूर), बारामती ॲग्रो लि. (पिंपळी), अंबालिका शुगर (कर्जत), भैरवनाथ शुगर विहाळ (करमाळा), श्री मकाई साखर कारखाना (भिलारवाडी), बारामती, टेंभुर्णी, इंदापूर एमआयडीसी, श्री आदिनाथ साखर कारखाना (शेलगाव), इंदापूर साखर कारखाना (बिजवडी), बिल्ट ग्राफिक प्रा.लि. भादलवाडी (इंदापूर), व्यंकटेश्‍वरा हॅचरीज लि. खडकी (दौंड), श्री विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (पिंपळनेर), पिंपळखुंटे ग्रामपंचायत (अंबड, ता. माढा).

धरणाची पातळी अन्‌ पाणीपुरवठ्याची स्थिती...

नदी उणे ८० टक्क्यांपर्यंत

सांडवा ०० टक्के

वीजनिर्मिती ०० टक्के

कॅनॉल उणे ३२.३३ टक्के

बोगदा उणे २१ टक्के

सीना-माढा ०० टक्के

दहिगाव उणे २.९६ टक्के

सोलापूर शहर उणे ५५.८८ टक्के

एनटीपीसी उणे ६० टक्के

धाराशिव उणे ६१.७४ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT