Water Tanker  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : ऐन पावसाळ्यात चंद्रपूरकरांची टँकरवरच भिस्त

Water Crisis : उन्हाळा संपून पावसाळा लागला. मात्र, पाणीटंचाईची समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. ऐन पावसाळ्यातही चंद्रपूर शहराच्या विविध प्रभागांतील नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.

Team Agrowon

Chandrapur News : उन्हाळा संपून पावसाळा लागला. मात्र, पाणीटंचाईची समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. ऐन पावसाळ्यातही चंद्रपूर शहराच्या विविध प्रभागांतील नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. सध्या दररोज ४० ते ५० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शंभरावर टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत होता.

चंद्रपूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. जून महिना संपायला आता पाच ते सहा दिवस शिल्लक आहे. या दिवसांत जिल्ह्यात अजून पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक भागांत अजूनही पाणीटंचाई आहे. महापालिकेने उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ टँकर सुरू केले.

खासगी टँकर पाच आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाईने तीव्र स्वरूप धारण केले होते. या दोन्ही महिन्यांत विविध प्रभागांत दररोज १०० ते १५० टँकरच्या खेपा होत होत्या. पावसाळा लागल्यावर पाणीटंचाईची समस्या कमी होईल, अशी आशा होती.

मात्र, अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक प्रभागांत पाणीटंचाईची समस्या कायम आहे. सध्या काही प्रभागांत दररोज टँकरने पाणी पोहोचविण्याचे काम मनपाच्या माध्यमातून सुरू आहे. मनपाच्या अमृत योजनेचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हे काम अजूनही पूर्ण झाले नाही. शहरातील काही भागांत पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

टँकरवर भिस्त असलेले प्रभाग

चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्ड, वडगाव, रमाबाईनगर, राजीव गांधी नगर, भिवापूर वॅार्ड, वडगाव, लक्ष्मीनगर, तुळशीनगर, वृदांवननगर, महाकाली कॉलरी, लालपेठ. दादमहल या भागांत गेल्या मार्च महिन्यांपासून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यातील काही भागांत दररोज तर काही भागांत एकदिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी १ हजार रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Vidarbha Rains: पश्चिम विदर्भात कुठे दमदार, तर कुठे पावसाची उघडीप

Suhana Khan Farmland: शाहरुखची लेक सुहाना शेतजमीन खरेदी प्रकरणात आली अडचणीत

Solar Spraying Pump Scheme: वीज आणि डिझेलचा खर्च वाचवा; सौर फवारणी पंप खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा

Crop Insurance: खरीप पीक विम्याचे ८ लाख ६० हजार अर्ज

SCROLL FOR NEXT