Satara News: सातारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या पूर्वसंमतीने आणि मोठ्या आशेने ट्रॅक्टर, तसेच इतर आधुनिक शेती अवजारे खरेदी केली. मात्र, प्रथम नगरपालिकांच्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचा मोठा फटका या अनुदानाला बसला आहे. आता निवडणुका संपल्या, आचारसंहिता संपून महिना उलटला, तरीही शासनस्तरावरून कृषी यांत्रिकीकरणासाठी असलेल्या अनुदानाची २२ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही..त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून, जिल्ह्यातील आमदारांनी या गंभीर प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे..Farm Mechanization Scheme: कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १२.९४ कोटींवर अनुदान प्रलंबित .आचारसंहितेचे ग्रहणकृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची लॉटरी लागली होती. कृषी विभागाने खरेदीच्या सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून किंवा खासगी सावकारांकडून उसनवारी करून यंत्रसामग्री खरेदी केली. मात्र, ऐनवेळी निवडणुका जाहीर झाल्याने ही प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर थंड बस्त्यात पडली..प्रशासकीय उदासीनता की निधीचा अभाव...आचारसंहिता संपून एक महिना झाला तरी अद्याप शासन स्तरावरून ‘फंड रिलीज’ करण्याबाबत हालचाली दिसत नाहीत. ‘निवडणुका झाल्या, सरकारचे काम झाले; पण आमच्या हक्काच्या पैशांचे काय?’ असा सवाल जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत. जिल्हा कृषी कार्यालयाकडून अनुदानासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात आहे..Farm Mechanization Scheme: यांत्रिकीकरणातून अनुदान वाटपासाठी पाच वर्षांची अट.अधिवेशनाकडून मोठी अपेक्षासध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या विषयावर ‘लक्षवेधी’ सूचना मांडून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत सभागृहात आवाज उठविण्याची गरज आहे. कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानासाठीचा निधी तातडीने वर्ग होण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न अपेक्षित आहेत..आकडेवारी आणि सद्यःस्थितीप्रलंबित प्रस्ताव : जिल्ह्यात २६०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव अनुदानाच्या प्रतीक्षेतरखडलेली रक्कम : ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर आणि इतर अवजारांचे मिळून सुमारे २० ते २२ कोटींचे अनुदान रखडले आहे.व्याजाचा भुर्दंड : अनुदान मिळेल या आशेवर घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना दरमहा सरासरी १० ते १२ टक्के व्याज सोसावे लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.