Dhule News: खानदेशात कांदा पीक जोमात आहे. काही भागात पुढील महिन्यात किंवा १५ ते २० दिवसात काढणी सुरू होईल. कांदा दर टिकून राहावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कांदा लागवड नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये झाली आहे. पीक सध्या जोमात आहे. त्यात पुढील महिन्याच्या अखेरीस काढणी होईल, अशी स्थिती आहे. .नोव्हेंबरमध्येच शेतकरी कांदा लागवडीची तयारी करीत होते. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. मध्यंतरी कांदा बियाणे दरवाढ सुरूच राहीली किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती. परंतु कांदा लागवडीबाबत नियोजन सतत बदलले. काहींची लागवड कमी झाली. .Onion Crop: खानदेशात कांदा पीक जोमात.कारण अन्य पिकांची लागवडही शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी केली. काहींनी लागवड टाळली . अनेकांनी रोपवाटिका तयार केल्या. उशिराच्या लागवडीसाठी रोपवाटिकांमधील रोपे तगण्याची स्थिती चांगली किंवा समाधानकारक होती. काही भागात या रोपवाटिका जोमात होत्या. चांगल्या पावसाने कांदा बियाणे बाजारातील तेजीही टिकली..Onion Crop Damage: चाळीस टक्के कांद्याचे पावसाने नुकसान.कारण लागवड नंतर वाढली. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत असल्याने त्याचा लाभ कांदा उत्पादकांना बियाणे खरेदीसंबधी झाला. बियाणे उगवणीशिवाय पैसे देवू नका, अशी हमी घेवूनही काही शेतकरी बियाणे विक्री करीत होते. अनेक शेतकरी उशिराच्या उन्हाळ कांदा पिकाकडे वळत असल्याची स्थिती होती. लागवडही वाढली आहे. सुरवातीला प्रतिकूल वातावरण होते. उष्णता, यात बियाण्याची उगवण व्यवस्थित होईल की नाही, अशी भीतीही होती. परंतु शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवणक्षमता टिकविली. पण डिसेंबरमधील पावसाने त्यातही नुकसान झाले. या महिन्याच्या अखेरीस कांदा काढणीवर येईल, अशी स्थिती काही भागात आहे..लागवड अधिकखानदेशाच टप्प्याटप्प्याने कांदा लागवड झाली आहे. यंदाची लागवड सुमारे ३८ हजार हेक्टरपर्यंत आहे. जळगाव जिल्ह्यात १२, धुळ्यात २० आणि नंदुरबारात सुमारे सहा हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. कांदा लागवड नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत झाली आहे. लागवडीत यंदा चांगली वाढ झाली आहे. विविध कालावधीत लागवड झाल्याने आवकही विविध टप्प्यांत होईल. एकाच वेळी आवक वाढणार नाही, अशीही स्थिती सध्या आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.