Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : मार्च महिन्यातच अंबड तालुक्यात विहिरींनी गाठला तळ

Water Crisis : अंबड तालुक्याला पावसाळ्यातील पाण्याशिवाय दुसरा पाण्याचा स्त्रोत नाही. कालव्याची सुविधा उपलब्ध नाही. दुधना, सुकना, लाहुकी, गल्हाटी आदी नद्या आहेत.

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात मार्च महिण्यातच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात भरून ठेवलेल्या शेततळ्यांचाही साठा संपत आला आहे. यामुळे फळबाग, भाजीपाला, फुलशेती व दूध उत्पादक शेतकऱ्यांवर पाणी टंचाईची वेळ आली आहे.

अंबड तालुक्याला पावसाळ्यातील पाण्याशिवाय दुसरा पाण्याचा स्त्रोत नाही. कालव्याची सुविधा उपलब्ध नाही. दुधना, सुकना, लाहुकी, गल्हाटी आदी नद्या आहेत. मात्र, नद्यात वाळूची तस्करी दिवसरात्र सुरू असल्याने नदी पात्रात वाळूचा थांगपत्ता नाही.

यामुळे जलसाठा तर सोडाच पण पर्यावरणाचा ऱ्हास होतानाचे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे. यामुळे कडक उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामस्थ, शेतकरी व पशुपालक यंदाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे काटखेड्याचे शेतकरी भागवतराव जऱ्हाड यांनी सांगितले.

अंबड तालुक्यात सतत दुष्काळाची गडद छाया दिसून येत आहे. शेतकरी, पशुपालकांना पशुधन, दुभती जनावरे यांचे संगोपन करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे फळबागा, फुलशेती व दुग्ध व्यवसाय पाणी टंचाईमुळे धोक्यात येत आहे.
- ओमप्रकाश राऊत, शेतकरी मार्डी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT