Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : वसई-विरारमधील गावे पाण्यावाचून तहानलेली

Water Scarcity : गावांना पाणी मिळावे, यासाठी १७ वर्षांपूर्वी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले; परंतु २००९ मध्ये महापालिकेची स्थापना झाली.

Team Agrowon

Palghar News : नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी ६९ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. यातील वसई-विरार महापालिकेत ५२ गावांचा समावेश आहे; मात्र अद्यापही यातील २३ गावे ही तहानलेलीच आहेत. प्रत्यक्ष अमृत पाणी योजनेच्या टप्पा दोनमधून पाणी केव्हा येणार, याची प्रतीक्षा आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

गावांना पाणी मिळावे, यासाठी १७ वर्षांपूर्वी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले; परंतु २००९ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. यात काही गावे महापालिका हद्दीत आली.

त्यामुळे पूर्वी उभारण्यात आलेले जलकुंभ, जलवाहिनी नादुरुस्त झाल्या. एकीकडे पश्चिम भागात असणाऱ्या गावांना पाणी मिळत नव्हते. त्यातच योजना राबवली जाणार म्हणून नागरिक सुखावले होते; परंतु अद्यापही घशाची कोरड कायम आहे.

महापालिका हद्दीत समाविष्ट असणाऱ्या ५२ गावांतील जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. त्यात असलेल्या त्रुटी, तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आहेत. त्यामुळे अहवालाप्रमाणे जलकुंभ दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

याकरिता प्रशासनाकडून पाच कोटींचा खर्च केला जाणार आहे. ६९ पैकी पालिकेत समाविष्ट गावांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने पालिकेने यापूर्वी जलकुंभ भरण्याकरिता मुख्य जलवाहिन्या अंथरल्या. सुमारे २९ गावांचा पाणीपुरवठा यापूर्वीच सुरू केला; मात्र अद्याप अनेक गावे तहानलेलीच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT