Water Scarcity : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत टंचाईच्या झळा

Water Crisis : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यादरम्यान, तलावात पाणीसाठा वाढला होता.
Water Crisis
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तुलनेने जिल्ह्यात पाणीसाठा चांगला आहे. अद्याप अर्धा पाणीसाठा असून मात्र गेल्या महिन्याभरातील साठ्यात अकरा टक्क्यांची घसरण आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा २३ टक्के जादा साठा ही बाब दिलासा देणारी आहे. मात्र, तलाव, विहिरी आणि कूनलिकांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होऊ लागली असल्याने दुष्काळी तालुक्यात टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यादरम्यान, तलावात पाणीसाठा वाढला होता. परंतु या भागात बागायती क्षेत्र वाढल्याने पिकांना पाणी देण्यासाठी उपसाही वाढला आहे. त्यामुळे पाणी पातळी घटली आहे.

Water Crisis
Water Scarcity : माणिकपुंज-नांदगाव पाइपलाइनमुळे यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही

दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे. परंतु प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी ५१ टक्के असली तरी महिन्याला १० ते ११ टक्क्यांनी पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीसाठा किमान एक महिना पुरेल अशी शक्यता आहे. सिंचन योजनाद्वारे तालुक्यातील सर्व तलाव पुन्हा भरून घ्यावेत, अशी मागणी आहे.

दुष्काळी भागात शेती, जनावरांसाठी व पिण्यासाठीच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे. अद्याप टँकरची मागणी मात्र झालेली नाही. जत पूर्वमध्‍ये टंचाईची स्थिती असून कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी या तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे; मात्र पाणी वाटपात काटेकोर नियोजनाची गरज आहे.

Water Crisis
Water Scarcity: पुणे जिल्ह्यात पाण्याची मागणी वाढली; धरणांतील जलसाठा वेगाने घटतोय

हे नियोजन पोटकालवे, शाखा कालव्यांपर्यंत व्हायला हवे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. परंतु सध्याची परिस्‍थिती पाहता मार्चपासून जत पूर्व भागात टंचाईबाबत उपाययोजना कराव्या लागतील.

प्रशासनाचा अंदाज

गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही यंदा टंचाई जाणवत आहे. मे-जूनपर्यंत जिल्ह्यातील १५७ गावांना पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी १८७ टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. याबाबतचा संभाव्य टंचाई कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.

पाणी योजनांच्या नियोजनाची अपेक्षा

आटपाडी, कवठेमहांकाळमध्ये पाणी योजनांच्या काटेकोर नियोजनाची अपेक्षा.

उन्हाचा तडाखा वाढताच दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईची चाहूल.

अद्याप टँकरची मागणी नाही. गतवर्षीपेक्षा २३ टक्के पाणीसाठा अधिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com