Warna Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Dam : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

Rain Update : शिराळा तालुक्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत १६८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत १६८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी (ता. २४) सकाळी साडेअकरा वाजता वक्रद्वारातून ७२१६ क्युसेकने पाण्यासा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.

शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता. २३) वारणा धरणाचे दोन वक्रद्वार एक मीटरने उघटून २२०० क्युसेक तर विद्यूत जनित्रमधून १६५८ क्युसेक असा एकूण ३८५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. बुधवारी (ता. २४) सकाळी सातच्या सुमारास धरणात २९.२९. टीएमसी म्हणजे ८१. १३ टक्के पाणीसाठा झाला.

वारणा धरण पाणलोट परिसरात अतिवृष्टी सुरूच असल्याने धरणात १६ हजार ९९२ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणात पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे धरण व्यवस्थापाकडून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी (ता. २४) सकाळी साडेअकराच्या सुमारास धरणाचे आणखी दोन वक्रद्वार उघडून पाणी सोडले आहे. धरणाच्या वक्रद्वारातून ७२१६ तर विद्युत जनित्रमधून १६८५ असा एकूण ८८७४ पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

चोवीस तासांत शिराळा तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस

मंडल पाऊस मिलिमीटरमध्ये

कोकरुड ४९

शिराळा ३६

शिरसी २९

मांगले ४०.५

सागाव १८.३

चरण ९१.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Roll Revision Protest: ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवा : डाॅ. अजित नवले

Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल

Drought Management: सरपंचांनो, गावाचा ताळेबंद मांडा..

Minimum Support Price: ‘कमी’भाव जाहीर

Drought Mitigation: दुष्काळ निवारणाला द्या नवा आयाम

SCROLL FOR NEXT