Almatti Dam : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला दिलासा, अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

Karnataka Irrigation Department : बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला धरणसाठ्यात होणारी आवक लक्षात घेत विसर्ग वाढवा असा आदेश दिला आहे.
Almatti Dam
Almatti DamAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Sangli Rain : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराला कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यापार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला धरणसाठ्यात होणारी आवक लक्षात घेत विसर्ग वाढवा असा आदेश दिला आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. यामुळे अलमट्टी धरणातून कालपर्यंत अंदाजे २ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवला होता. दरम्यान आज सकाळी पुन्हा २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नद्यांमधून, जलाशयातून १ लाख ८० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. अलमट्टी धरणातून २ लाख २५ हजार क्युसेक्स तर घटप्रभा जलाशयातून १०००० क्युसेकचा नियंत्रित विसर्ग सध्या ८० टक्के क्षमतेवर सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीतीरावरील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यासह पूरग्रस्त भागासाठी सर्व तहसीलदारांना नियोजित ४२७ ठिकाणी निवारा केंद्रे स्थापन झाल्याबद्दल शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य पुरस्थितीसाठी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाच बोटी खरेदी आणि सर्चलाइट्स उपलब्ध करून देण्याच्या योजनांसह बोटी सज्ज ठेवाव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत.

Almatti Dam
Kolhapur Satara Dam Water : राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला; कोयना, काळम्मावाडी धरणाची जाणून घ्या स्थिती

कृष्णा नदी ४२ फुटांवर

कृष्णेच्या पातळीत २४ तासांत दोन फुटांनी वाढ झाली. तर तालुक्यातील पंचगंगा, दूधगंगा, वारणा नद्यांच्या पातळीत वाढ सुरू आहे. शिरोळ तालुक्यात चारही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली.

कृष्णा नदीची सध्या ४२ फुटांच्या पुढे पाणी पातळी असून राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात विसर्ग होत आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी ५२ फुटांवर असून धोका पातळी ५८ फुटांवर आहे.

वारणा धरण २९.६१ टीएमसी भरले असून वारणेतून आठ हजार ८७४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. आलमट्टी धरण ९१.२६३ टीएमसी इतके भरले असून आलमट्टीत एक लाख ७२ हजार ८०७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आलमट्टीच्या २६ दारांतून दोन लाख पंचवीस हजार क्युसेक पाणी विसर्ग केले जात असल्याची माहिती पांटबंधारे विभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com