Warna Dam : ‘वारणा’तून पाण्याचा विसर्ग वाढवला

Rain Update : सांगली जिल्ह्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी (ता. २२) रात्री पुन्हा अतिवृष्टी झाली. मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत संपलेल्या २४ तासांत ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Warna Dam
Warna DamAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी (ता. २२) रात्री पुन्हा अतिवृष्टी झाली. मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत संपलेल्या २४ तासांत ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास धरणाच्या वक्रद्वारामधून २१५२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सरू केला आहे. सध्या धरणातून एकूण पाण्याचा विसर्ग ३८०० क्युसेकने सुरू आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती वारणा धरण व्यवस्थापनाने दिली.

Warna Dam
Koyna Dam : ‘कोयना’त २४ तासांत सहा टीएमसी पाण्याची वाढ

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. वारणा धरण पाणलोट परिसरात अतिवृष्टी सुरू असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सकाळी आठपासून अकरापर्यंत २० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

वारणा धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. सद्यःस्थितीत २८.१५ टीएमसी म्हणजे ८१.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत वारणा धरणात १.३४ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

Warna Dam
Gosikhurd Dam : गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले

२८.१५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी २१.२७ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. वारणा धरणाच्या कालवा व विद्युतगृहाद्वारे १६४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने सध्या धरणात १७ हजार १५३ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे.

त्यामुळे धरणाच्या वक्रद्वारातून दोन हजार क्युसेकने पाणी नदीत सोडले जाणार आहे. विद्युत गृहातून १६४८ तर वक्रद्वारातून २१५२ असा एकूण ३८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com