Dairy Business
Dairy Business Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : दुग्ध व्यवसायातील विविध तंत्रज्ञान शिकायचेय?

 गोपाल हागे

गोपाल हागे

Milk Production : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत (अकोला) पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कार्यरत आहे. त्याद्वारे विविध गायी, म्हशींच्या जातींचे संवर्धन, पैदास, खाद्य, प्रक्रिया आदींच्या अनुषंगाने संशोधनासह तंत्रज्ञान वापर केला जात आहे. शेतकऱ्यांना त्या माध्यमातून जातिवंत जनावरे व गोठा व्‍यवस्थापन तंत्रज्ञान उपलब्ध होऊन यशस्वी दुग्ध व्यवसाय करता यावा हा त्यामागील उद्देश आहे.

अकोला येथील डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कार्यरत आहे. त्या मार्फत दुग्ध व्यवसायातील विविध संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत त्याचा

प्रसार केला जात आहे. त्यामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे. विभागात सुमारे आठ देशी जातिवंत गोवंशाचे संगोपन व वृद्धीकरण कार्यक्रम सुरु आहे. यात महाराष्ट्रातील गौळव (विदर्भ), लाल कंधार (मराठवाडा), देवणी (मराठवाडा), खिलार (पश्‍चिम महाराष्ट्र) व डांगी (कोकण वा अति पावसाच्या प्रदेशातील) तसेच साहिवाल (पंजाब), गीर (गुजरात), कांक्रेज (गुजरात), थारपारकर (राजस्थान- गुजरात सीमेवरील) या गोवंशांचा समावेश आहे. विदर्भातील नागपुरी म्हशींच्या गौळव उपजातीचाही समावेश आहे.

साहिवाल गायीचे संवर्धन

विदर्भ, मराठवाड्याचा विचार करता अधिक तापमान आणि पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेत अधिक दूध उत्पादनक्षम जातींचे संवर्धन व जाती तयार होण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न आहेत. ‘एनडीडीबी’ या प्रसिद्ध संस्थेच्या सहयोगातून आठ जातिवंत साहिवाल गायी उपलब्ध झाल्या आहेत.

अत्याधुनिक ‘आयव्हीएफ’ व कृत्रिम रेतनासाठी ‘सेक्स सॉर्टेड सीमेन’ तंत्राचा अवलंब करून उच्च प्रतीच्या आठ कालवडी तयार झाल्या आहेत. यामध्ये नागपूर येथील ‘माफसू’ विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले आहे. विदर्भातील हवामानात सध्या प्रति दिन १२ ते १३ लिटर दूध त्या देत आहेत. येत्या काळात हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला जाणार आहे.

चारा पिकांवर संशोधन

आधुनिक पद्धतीचा मुक्तसंचार गोठा आहे. शिवाय जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात उच्च तापमानाला सहनशील चारा पिकांच्या जातींवर संशोधन सुरू आहे. वर्षभर हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी बहुवर्षायू व हंगामी अशा संकरित नेपियर, जयवंत, यशवंत, बरसीम, लसूण घास, मका आदींची लागवड केली आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता अत्यल्प ओलाव्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या निवडुंग वनस्पतीची लागवड आहे. पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति दिवशी साधारणपणे प्रति गाय १५ ते २० किलो हिरव्या चाऱ्याची गरज लागते. ती लक्षात घेता बहुवर्षायू विविध चारा पिकांच्या जातींचे ठोंब विभागामार्फंत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तज्ज्ञांचे सहकार्य

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे मार्गदर्शन विभागाला मिळते. डॉ. शेषराव चव्हाण विभागप्रमुख आहेत. विभागांतर्गत डॉ, राजेश्‍वर शेळके, डॉ, प्रकाश कहाते (दुग्ध पदार्थ मूल्यवर्धन), डॉ. संजयकुमार शेगोकार (व्यावसायिक कोंबडीपालन), डॉ. संजीवकुमार नागे (शेळीपालन), डॉ. किशोर बिडवे (चारा पिके) हे तज्ज्ञ कार्यरत आहेत.

डेअरी व्यवस्थापक रवी पवार, राजेश ढगे यांचेही सहकार्य मिळते. डॉ. श्यामसुंदर माने (अधिष्ठाता, कृषी) यांचेही मार्गदर्शन लाभते. महिन्याला ३० ते ४० शेतकरी विभागाला भेट देतात. शिवाय शिवारफेरी, विद्यापीठाचे ॲग्रोटेक, प्रदर्शने या माध्यमांतून काही हजारांपासून ते लाखांपर्यंत शेतकरी येथे भेट देत असतात.

विभागातील अन्य उपक्रम

- वर्षाला २०० ते २२५ टन मुरघासाची निर्मिती. उन्हाळ्यात त्याचा वापर.

-अझोला खाद्यनिर्मिती प्रात्यक्षिक युनिट आहे.

- व्यावसायिक शेळीपालनांतर्गत उस्मानाबादी जात, कोंबडीपालनात कावेरी, गिरिराज, वनराज, कडकनाथ, ब्रॉयलर आदींचेही संगोपन व उत्पादन.

-‘गोबर गॅस’ युनिटद्वारे इंधन निर्मिती.

- गायी, म्हशींच्या दुधाची विक्री. शिल्लक दुधापासून पनीर, दही श्रीखंड, सुगंधी दूध आदींचीही निर्मिती. कृषी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांकडे ही संपूर्ण जबाबदारी असते.

-पदव्युत्तर, आचार्य (पीएचडी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह शासकीय, निमशासकीय, सहकारी विभाग, पशुविकास महामंडळ यांच्या गरजेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम. यात आधुनिक पशुपालन, दुग्धपदार्थ निर्मिती, आधुनिक कोंबडी पालन, व्यावसायिक शेळीपालन तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश.

‘पीडीकेव्ही अर्थ गोल्ड’ गांडूळ खत निर्मिती

प्रक्षेत्रावरील जनावरांचे शेण, मूत्र, परिसरातील पालापाचोळा, पीक अवशेष यांच्या वापरातून ‘पीडीकेव्ही अर्थ गोल्ड’ नावाने गांडूळ खत निर्मिती केली जाते. यात कमी खर्चाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ‘ग्रीन शेडनेट’च्या माध्यमातून प्लॅस्टिक बेड, जमिनीवरील बेडचा वापर उत्पादनासाठी होतो.

सध्या दररोज पाचशे ते सहाशे किलो एवढी निर्मिती असली तरी प्रति दिन एक टन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंधरा रुपये प्रति किलो दराने तीन किलो व ३० किलो बॅगेतून विक्री होते. पाच लिटर कॅनमधून ५० रुपये प्रति लिटर दराने व्हर्मिवॉशची विक्री होते.

प्रक्षेत्रावरील जनावरांचे शेण, मूत्र, परिसरातील पालापाचोळा, पीक अवशेष यांच्या वापरातून ‘पीडीकेव्ही अर्थ गोल्ड’ नावाने गांडूळ खत निर्मिती केली जाते. यात कमी खर्चाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ‘ग्रीन शेडनेट’च्या माध्यमातून प्लॅस्टिक बेड, जमिनीवरील बेडचा वापर उत्पादनासाठी होतो.

सध्या दररोज पाचशे ते सहाशे किलो एवढी निर्मिती असली तरी प्रति दिन एक टन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंधरा रुपये प्रति किलो दराने तीन किलो व ३० किलो बॅगेतून विक्री होते. पाच लिटर कॅनमधून ५० रुपये प्रति लिटर दराने व्हर्मिवॉशची विक्री होते.

संपर्क ः डॉ. राजेश्‍वर शेळके, ९८५०२८५४४२

डॉ. किशोर बिडवे, ९९२१४००२९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT