Wheat Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : माळशिरसमध्ये गहू पेरणीसाठी थंडीची प्रतीक्षा

Rabi Season : रब्बी हंगामातील ज्वारीची पेर ३३ टक्के झाली असून, गहू व हरभरा पेरणीसाठी अनुकूल हवामान नाही.

Team Agrowon

Solapur News : तालुक्यात परतीच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. रब्बी हंगामातील ज्वारीची पेर ३३ टक्के झाली असून, गहू व हरभरा पेरणीसाठी अनुकूल हवामान नाही. पेरणीसाठी थंडीची आवश्‍यकता असून, शेतकरी थंडी पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

माळशिरस तालुक्याचा काही भाग वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. वेळोवेळी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे कांदा व मका पीक जोमात आल्याने व भाव चांगला मिळाल्याने शेतकरी वर्ग समाधानी असून, आता रब्बी पेरणीच्या तयारीला लागला आहे.

तालुक्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र पाच हजार ७३६ हेक्टर असून, आजअखेर एक हजार ९३९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेर झाली आहे.

मका पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार २८३ असून पेरणी तीन हजार ६७२ हेक्टर झाली आहे. गहू पिकाचे सरासरी क्षेत्र चार हजार ६२६ हेक्टर असून अद्याप गहू पिकाची पेर झाली नाही.

त्याचबरोबर हरभरा पिकाचे क्षेत्र दोन हजार १९१ असून केवळ ६५ हेक्टर पेर झाली असून, शेतकरी अनुकूल हवामानाच्या प्रतीक्षेत आहेत. तर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऊस लागवड करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Assessment: दुष्काळाचे पंचनामे ८० टक्क्यांवर !

Farmer Loan Waiver: कर्जमाफीची ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर

Climate Change: प्रशांत महासागराच्या तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढ

Delhi Protest: राजधानी दिल्लीला तुरुंग का बनवले?

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT