Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : परभणीतील १३ मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रतिक्षा

Team Agrowon

Parbhani News : २०२३ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी पावसाच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण ७५० मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झालेल्या महसूल मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु ७५० मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस होऊनही परभणी जिल्ह्यातील १३ मंडलांना दुष्काळी मंडलातून वगळण्यात आले आहे.

या मंडलांचा दुष्काळी मंडलात समावेश करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने दोनवेळा प्रस्ताव पाठवलेला आहे.परंतु शासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.दुष्काळ जाहीर न केल्यामुळे या १३ मंडलातील शेतकरी दुष्काळी सवलतीपासून वंचित राहणार आहेत.

परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७६१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरासरी ५२२.५ मिलिमीटर (६८.६ टक्के) पाऊस झाला आहे. राज्यशासनाने १० नोव्हेंबर काढलेल्या शासन निर्णयातील निकषानुसार जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडलामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करणे अपेक्षित होते.

परंतु केवळ ३९ मंडलांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले. या कालावधीत एकूण ७५० मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झालेल्या टाकळी कुंभकर्ण (ता. परभणी), दूधगाव, वाघी धानोरा (ता. जिंतूर), मोरेगाव (ता. सेलू), रामपुरी, ताडबोरगाव (ता. मानवत), कासापुरी (ता. पाथरी), वडगाव, शेळगाव (ता. सोनपेठ), पिंपळदरी (ता. गंगाखेड), रावराजूर, पेठशिवणी (ता. पालम), कावलगाव या १३ मंडलांना मात्र दुष्काळी मंडलातून वगळण्यात आले आहे.

या मंडलात जून ते सप्टेंबर या कालवधीत ३०३.८ ते ६०३.४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु शासनाने या १३ मंडलांना दुष्काळी मंडलातून वगळले आहे. प्रचलित नियमानुसार अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आलेल्या दुष्काळाग्रस्तांच्या सवलती लागू होतात.

त्यात जमिनीत महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,

आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश आहे. परंतु शासन निर्णयानुसार ३९ मंडले दुष्काळी सवलतीसाठी पात्र ठरतात. दुष्काळी सवलती लागू करण्यासाठी पैसेवारीच्या निकषांना अर्थ आहे की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

परभणी जिल्ह्यातील १३ मंडलातील -जून ते सप्टेंबर पाऊस स्थिती (मिलिमीटर)

मंडल सरासरी पर्जन्यमान प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी

टाकळी कुंभकर्ण ८११.० ४९४.५ ६१.०

दूधगाव ७३३.४ ५२५.६ ७१.७

वाघी धानोरा ७३३.४ ३७७.४ ५१.५

मोरेगाव ७३७.३ ५४४.१ ७३.८

रामपुरी ७३२.२ ३७६.० ५१.४

ताडबोरगाव ७३२.२ ६०३.४ ८२.४

कासापुरी ७३९.५ ४३८.४ ५९.३

वडगाव ६७९.६ ४४२.९ ६५.२

शेळगाव ६७९.६ ४०७.३ ५९.९

पिंपळदरी ७२५.७ ३०३.८ ४१.९

रावराजूर ७३८.९ ५५५.१ ७५.१

पेठशिवणी ७३८.९ ५४०.० ७३.१

कावलगाव ८०७.० ४९७.५ ६१.६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT