Aphis Craccivora: चवळी हे पीक बहुउद्देशीय असून, ते डाळ, भाजीपाला, चारा व हिरवळीचे पीक म्हणूनही वर्षभर घेतले जाते.त्यावर येणारी मावा ही कीड बहुभक्षी असून, ती सुमारे ६० ते ७० पिकांवर उपजीविका करते. ही कीड समूहाने राहून पाने, कोवळे शेंडे व शेंगा यामधून सोंडेद्वारे रस शोषते.