Team Agrowon
राज्यात नव्याने निर्माण झालेल्या, पण जेथे पर्जन्यमापक यंत्रे नाहीत, अशा २२० मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली.
मंगळवारी (ता. २) झालेल्या बैठकीत ४० तालुके आणि १०२१ मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर द्यावयाच्या सवलतींचाही आढावा घेण्यात आला.
२०१८ मध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता. तसेच २६८ मंडलांमध्येही दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सवलती देण्यात आल्या होत्या.
त्यानंतर ज्या महसूल मंडलांमध्ये अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून ८ सवलती दिल्या होत्या.
त्या धर्तीवरच १०२१ मंडले आणि ४० तालुक्यांतील २३९ मंडलांव्यतिरिक्त २२० मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली.
या मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आलेली नाहीत, तसेच काही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रेही बंद अवस्थेत आहेत.