APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Market Committee Election : पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी आज मतदान

APMC Election : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होते आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होते आहे. या जिल्ह्यातील उर्वरित बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान होणार, असल्याची माहिती सहकारी विभागाच्या सूत्रांनी दिली.

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल ५९ बाजार समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७, बीडमधील ८, लातूरमधील १०, जालन्यातील ५, धाराशिवमधील ८ बाजार समित्यांचा समावेश होता.

५९ बाजार समित्यांपैकी १४ बाजार समितीच्या निवडणुका त्या बाजार समित्यांना निवडणूक खर्च झेपत नसल्याने रद्द करण्यात आल्या होत्या. निवडणूक जाहीर झालेल्या काही बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला, तर काही बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर व कन्नड या बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान होते आहे. या चार बाजार समित्यांच्या ७२ जागांसाठी १० हजार ९५४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

१७० कर्मचारी व पोलिस बंदोबस्त या मतदानाच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, गंगापूर या बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे. जालन्यातील घनसावंगी व परतूर या दोन बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला तर मंठा, आष्टी, अंबड या बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, बीड, गेवराई, केज, परळी, वडवणी या बाजार समिती २८ एप्रिलला, तर माजलगाव व पाटोदा बाजार समिती साठी ३० एप्रिल ला मतदान होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व आठही बाजार समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी ता. २८ ला मतदान होणार आहे.

यामध्ये धाराशिव, कळंब, वाशी, भूम, परांडा, मुरूम, उमरगा, तुळजापूर या बाजार समितीचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, चाकूर, उदगीर या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे.

तर निलंगा, देवणी, औराद शहाजानी, जळकोट, अहमदपूर, रेनापूर या बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे. प्रत्येक बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी व भाजप - सेना युतीच्या गटांनी आपला पॅनेलच्या नावाखाली जोर लावला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतो याचे गणित मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT