Nashik Apmc Election Update : नाशिक जिल्ह्यात प्रचार शिगेला पोहोचला

नाशिक जिल्ह्यात १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
Nashik APMC Election
Nashik APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यात १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अनेक ठिकाणी आजी-माजी लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली असून प्रचाराचा धुरळा उडला असून अंतिम टप्प्यात निवडणूक आली आहे.

यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. मात्र बाजार समिती प्रचार रणधुमाळीत विधानसभेची पूर्वतयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली जात असतानाच जिल्ह्यात मात्र शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते एकमेकांसमोर भिडले आहेत. तर जिल्ह्यात देवळा वगळता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दोन्ही गटांमध्ये आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर विरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. कदम यांच्या सोबतीला राजकीय वजन असलेल्या पवार कुटुंबातील अमृता पवार यासोबत गोकूळ गिते असल्याने रंगत वाढली आहे.

Nashik APMC Election
Jalgaon Market Committee Election Update : बाजार समिती निवडणुकीत जातीय समीकरणे होताहेत वरचढ

सिन्नर बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी पॅनल आहे. येथे राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या गटबाजीमुळे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी थेट वाजे यांच्या गटात प्रवेश केला.

चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उत्तम भालेराव व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य परिवर्तन पॅनेल व भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे.

नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे पुरस्कृत शिवसेना-भाजपविरुद्ध माजी आमदार ॲड. अनिल आहेर, पंकज भुजबळ यांच्या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे.

नाशिक येथे माजी खासदार देविदास पिंगळे व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत होत आहे. मात्र परस्परांवर आरोप करत नेते मतदारांसमोर जात आहेत.

मात्र आमदार हिरामण खोसकर यांना चुंबळे यांनी धमकी दिल्याने वातावरण तापले होते. इतर लोकप्रतिनिधी येथे मात्र उघड पुढे आलेले नाहीत. मनमाड बाजार समितीत ठाकरे गट व शिंदे गटसर्मथक एकमेकांना भिडले होते.

Nashik APMC Election
Kolhapur APMC Election Update : कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीसाठी ६० केंद्रांवर मतदान

आजी-माजी पालकमत्र्यांनी घातले लक्ष...

मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे गटाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये लढत होत आहे. मात्र येथेही चुरस वाढली आहे. येवला आणि लासलगाव बाजार समितीत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यंदा विशेष लक्ष घातले आहे.

लासलगाव येथे मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, जयदत्त होळकर यांच्या विरोधात माजी सभापती पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्‍वर जगताप, राजेंद्र डोखळे यांचा पॅनेल असणार आहे.

येवला बाजार समितीत भुजबळ यांनी माजी आमदार मारोतराव पवार व ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांना सोबत घेऊन आखणी केली आहे. मात्र ठाकरे गटाच्या शिवसेनेची दोन्ही पॅनेलमध्ये विभागणी होऊन आमदार नरेंद्र दराडे विरोधात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com