Lok Sabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीला सुरूवात ; पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ५ जागांसाठी मतदान

Lok Sabha Election In Maharashtra : देशभरात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (ता.१९) पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

Mahesh Gaikwad

Lok Sabha Election Voting Update : देशभरात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (ता.१९) पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १०२ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा या पहिल्या टप्प्यात समावेश असून सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे.

लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.

उमेदवरांची प्रतिष्ठा पणाला

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील एक हजार ६२५ उमेदवार लोकसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये १३४ महिल उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यासाठी १६.६३ कोटी मतदारांच्या हातात या उमेदवारांचे भवितव्य असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाराष्ट्रातील ५ जागांसाठी मतदान

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

'या' ठिकाणी काटे की टक्कर

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपच्या नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे.

तर रामटेकमध्ये शिवसेनेच्या राजू पारवे आणि काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांच्यातील लढतीकडेही लक्ष लागले आहे. गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्यात रंगतदार लढत होत आहे. चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि भंडारा-गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांच्यात थेट लढत होत आहे.

पहिल्या टप्प्यात 'या' राज्यांमध्ये मतदान

अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, नागालॅंड, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडु, मेघालय, मिजोरम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू कश्मीर, लक्षद्वीप, पॉंडेचरीमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT