Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात नव्याने १६९ मतदान केंद्रे वाढली

Election Update : सन २०१९ च्या निवडणुकीवेळी ८ हजार २१३ मतदान केंद्रे होती. पण, मतदार वाढल्याने ही संख्या यावेळी ८,३८२ झाली आहे.
Elections
Electionsagrowon
Published on
Updated on

Pune News : जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीला प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. एका बाजूला मतदारांची संख्या वाढत असल्याने या निवडणुकीच्या मतदानासाठी नव्याने १६९ मतदान केंद्रे वाढवण्यात आली आहेत.

सन २०१९ च्या निवडणुकीवेळी ८ हजार २१३ मतदान केंद्रे होती. पण, मतदार वाढल्याने ही संख्या यावेळी ८,३८२ झाली आहे. तर, जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान केंद्रे ही पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी आहेत. पुणे जिल्ह्यात जानेवारीपर्यंत २३ अंतिम मतदार यादीनुसार, ८१ लाख २७ हजार इतके मतदार होते.

त्यात आतापर्यंत नवमतदारांनी भरलेल्या अर्जामुळे मतदारसंख्या ८२ लाख ९२ हजार ९५१ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बाराशेपेक्षा जास्त मतदार असल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्र संख्या वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार आयोगाने नवीन १६९ मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे.

Elections
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेत 'गोकुळ'ची भूमिका काय? अध्यक्ष अरूण डोंगळेंना मुख्यमंत्र्यांचा थेट फोन

दरम्यान, पाचपेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेली जिल्ह्यात ५१० ठिकाणे आहेत. त्यात पुणे लोकसभा मतदारसंघात १८५ ठिकाणी पाचपेक्षा अधिक केंद्रे आहेत. वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर या ठिकाणी पाचपेक्षा अधिक केंद्रे आहेत.

बारामती मतदारसंघात केवळ पुरंदर तालुक्यात १७ ठिकाणी, तर बारामतीमध्ये ८७ ठिकाणी पाचपेक्षा अधिक केंद्रे आहेत. शिरूर मतदारसंघात एकूण १३३; तसेच भोसरी, हडपसर वा ठिकाणी सर्वाधिक पाचपेक्षा केंद्रे आहेत, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली.

Elections
Lok Sabha Election 2024 : दीड हजार वयोवृद्ध, दिव्यांग करणार घरूनच मतदान

नवीन मतदान केंद्रांची भर

पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्वी २०१३ केंद्रे होती. त्यात पाच केंद्राची भर पडल्याने २०१८ केंद्रे झाली आहेत. यातील ३३ केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. वडगाव शेरी मतदारसंघात २८ केंद्रे वाढली आहेत. शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंटमध्ये एकही मतदान केंद्र बदलले नाही.

बारामती लोकसभा मतदारसंघात ६६ केंद्रांची भर पडली असून, त्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ५० केंद्रांचा समावेश आहे. मावळ मतदारसंघात ३१ केंद्रे वाढली आहेत. शिरूर मतदारसंघात ६७ केंद्रांचा नव्याने समावेश झाला आहे. यात शिरूर विधानसभा मतदारसंघात ३४, हडपसरमध्ये २७ केंद्रांचा नव्याने समावेश झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com