Bacchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver: विठुमाउलीने मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीसाठी सद्‍बुद्धी द्यावी : कडू

Bacchu Kadu: मुख्यमंत्री एकदशीला विठ्ठमाउलीच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यांना सद्‍बुद्धी द्यावी आणि पंढरपुरातूनच कर्जमाफीची घोषणा व्हावी.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: मुख्यमंत्री एकदशीला विठ्ठमाउलीच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यांना सद्‍बुद्धी द्यावी आणि पंढरपुरातूनच कर्जमाफीची घोषणा व्हावी, अशी माझी विठुमाउलीला प्रार्थना असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

श्री. कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी जूनमध्ये आंदोलन केले. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधिस्थळाजवळ ते उपोषणाला बसले होते. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, अशी घोषणा केली होती.

त्यानुसार ती द्यावी अशी त्यांची मागणी होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कडू यांची समजूत घालण्यासाठी पाठविण्यात आले. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा शिष्टाई केली. राज्य शासनाने यावर एक समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

त्यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित केले. मात्र समिती स्थापनेस होत असलेली दिरंगाई लक्षात घेता त्यांनी ७ जुलैपासून पुन्हा पदयात्रा काढण्याचा इशारा दिला. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर तीन जुलैला मंत्रालयात बैठक लावण्यात आली आहे. महसूलमंत्री बावनकुळे हे बैठकीला उपस्थित राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT