Pre-Kharif Review Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agricultural Production Plan : हिंगोली जिल्ह्यातील सर्व कृषी सहायकांनी गावनिहाय कृषी उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत, असे निर्देश लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांन दिले.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील सर्व कृषी सहायकांनी गावनिहाय कृषी उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत, असे निर्देश लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांन दिले.

मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय कृषी अधिकारी बी. आर. वाघ आदींसह तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक उपस्थित होते.

कदम म्हणाले, की सर्व कृषी सहायकांचे मिळून तालुक्याचा तालुका कृषी उत्पादन आराखडा तयार केला जाणार आहे. हे काम जवळपास जिल्ह्यामध्ये ९० टक्के पूर्ण झालेले असून, उर्वरित काम गुरुवार (ता. १६) पूर्ण केले जाईल.

सर्व कृषी सहायकांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे या घटकांचे १० हेक्टर किंवा १० संख्या एवढे लक्ष्यांक दिलेले आहेत. इतर सर्व योजनांचे सर्व कृषी सहायकांना काही बाबींच्या विशेष असतात त्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया केंद्रासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांना माहिती सांगून त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचे काम मंडळ कृषी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.

सर्व कामावर देखरेख करून सर्व कामे वेळेवर पार पडण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांची आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या घटकांच्या बाबत विविध स्तरांवर जबाबदाऱ्या देण्यात येऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल याचे नियोजन जिल्ह्यामध्ये या वर्षी करण्यात आलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing: नाशिक जिल्ह्यात रब्बीचा सरासरीपेक्षा अधिक पेरा

Groundwater Management: शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक माहितीचा वापर करावा

Mango Tudtude: आंबा मोहारावरील तुडतुडे किडीचे प्रभावी व्यवस्थापन

Farmer Assault: शेतकऱ्याला मारहाण प्रकरणाचे उमटले पडसाद

Krushi Sanjeevani Project: ‘कृषी संजीवनी’तून शेतकऱ्याला २४ तासांत अनुदान

SCROLL FOR NEXT