Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Collector Dr. Kiran Patil : जिल्ह्यातील विक्रेत्यांची नावे व पत्ता जिल्ह्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
Review Meeting
Review MeetingAgrowon

Buldhana News : आगामी खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे विक्री होऊ नयेत यासाठी प्रशासनाने भरारी पथके नेमावीत. तसेच जिल्ह्यातील विक्रेत्यांची नावे व पत्ता जिल्ह्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांवर शेतकरी मोठ्या संख्येने अवलंबून आहेत. या शेतकऱ्यांवर संकट आल्यास त्यांची परिस्थिती बिकट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आणि त्यांची उत्पादकता वाढणारी पिके घेण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असेही ते म्हणाले.

खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत डॉ. पाटील बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, की आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल अधिक होता.

Review Meeting
Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

यावर्षी शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, पिशवी त्यांना सांभाळून ठेवण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच विक्रेत्यांची नावे आणि पत्ते जिल्ह्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावेत.

याबरोबरच रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती देण्यात यावी. चांगले वाण आणि कमी पाण्यात चांगली उत्पादकता देणारी, तसेच शेतीमधील नवीन बाबींची माहिती देण्यात यावी. नवीन संशोधनाची माहिती देऊन शेतकऱ्यांना शेती संरक्षित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना शेती सुकररित्या करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि इतर योजनांचा लाभ देण्यात यावा. एकात्मिक पद्धतीने शेती करण्यासोबतच त्यांचा शेतकरी उत्पादक कंपनीशी समन्वय साधून देण्यात यावा.

Review Meeting
Kharif Season : कोल्हापुरात खरिपाचे २ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्र

पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना आपदग्रस्तवेळी मदत मिळण्यास मदत होते. यावर्षी २३४ कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे. यासोबतच अपघात विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रकरणे तातडीने निकाली काढावेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यातून ३३२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन वाणांची पिके देण्यात यावी. हळद, ओवा सारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच फळ पिके, बांबू लागवड आणि वैरण विकासाची कामे करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना ज्या योजनांमधून लाभ मिळणार आहे, अशा योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

पीककर्ज वाटपासाठी विशेष प्रयत्न करा

शेतकऱ्यांना हंगामात मदतीसाठी पीककर्ज महत्त्वाचे आहे. यावर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. बँकांनी कर्ज प्रक्रिया राबवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी, असे निर्देशही डॉ. किरण पाटील यांनी दिले.

आगामी खरिपातील प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)

सोयाबीन ४ लाख १३४१५

कपाशी १ लाख ९५ हजार

ज्वारी ४८१५

मका २२३४५

तूर ८२ हजार ७८५

मूग ९९९७

उडीद ८२७८

तीळ ४४०

एकूण ७३९७२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com