Washim News: मंगरुळपीर (जि. वाशीम) तालुक्यातील गोगरी शिवारात कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला चपलेने मारहाण केल्याच्या घटनेचे राज्यभर सर्वत्र पडसाद उमटले असून विविध शेतकरी संघटना, राजकीय नेते या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहेत. दरम्यान घटनेनंतर अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांनी संबंधित शेतकऱ्याची मंगळवारी (ता. १३) रात्रीच भेट घेऊन या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले..गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार या शेतकऱ्याने मनरेगाअंतर्गत संत्रा फळबाग लावली आहे. या योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने काही शेतकरी कृषी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे मंगळवारी (ता. १३) आपल्या सहकाऱ्यांसह गोगरी येथे पाहणीसाठी आले असल्याचे समजल्यानंतर पवार हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी विचारणा केली..Suraj Chavhan Resign: राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची हकालपट्टी.या ठिकाणी मोबाइलने शुटिंग केले जात होते. शुटिंग का घेत आहात या कारणावरून संबंधित व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्याचा दावा होत आहे. अधिकाऱ्याने संबंधिताला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हे प्रकरण शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या कारणातून झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे..Non Cognizable Offence: आमदार संजय गायकवाड यांच्यावर मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल.या घटनेची माहिती मिळताच विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी तातडीने गोगरी येथे भेट देत संबंधित शेतकऱ्याबरोबरच चर्चा केली. त्यांनी संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. या प्रकरणात चौकशीनंतर योग्य ती कारवाई निश्चित होईल, असेही आश्वासन दिले..विरोधी पक्षांनी घेरलेतालुका कृषी अधिकाऱ्याने केलेल्या मारहाण प्रकरणाने कृषी खात्यावर टीका केली जात आहे. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. कृषीप्रधान भारत देशात जर शेतकऱ्यांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर शेतकऱ्यांनी न्यायासाठी जायचे तरी कुठे, हा प्रश्न आहे. शेतकरीविरोधी फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही यांनी म्हटले आहे..या प्रकरणाची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली आहे. घटनेनंतर मंगळवारी (ता. १३) रात्रीच मी संबंधित शेतकऱ्याची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली आहे. या प्रकरणाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशसुद्धा दिले आहेत.- गणेश घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.