Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Kharip Sowing Update : येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आठ लाख १ हजार २१० हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजित करण्यात आली आहे.
Kharif Crop Planning Review Meeting
Kharif Crop Planning Review MeetingAgrowon
Published on
Updated on

Beed News : येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आठ लाख १ हजार २१० हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजित करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक तीन लाख ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन तर दोन लाख ७७ हजार ६०० हेक्टरवर कापसाचे क्षेत्राचा समावेश आहे.

Kharif Crop Planning Review Meeting
Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.१) खरीप पीक नियोजन आढावा बैठक झाली. विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदी उपस्थित होते.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८५ हजार ३५९ हेक्टर आहे. गतवर्षी ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या होत्या, तर जवळपास १२ लाख ४३ हजार १०७ टन विविध पिकांचे उत्पादन झाले. येत्या खरिपात पाऊस काळ चांगला राहणार असल्याचा अंदाज आहे. यंदाच्या पेरण्यातून १४ लाख ४६ हजार ३४६ टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

Kharif Crop Planning Review Meeting
Kharif Sowing : यंदाचे खरीप क्षेत्र राहणार साडेचार लाख हेक्टरवर

गत पाच वर्षांच्या खरिपातील बियाणे विक्रीच्या सरासरीनुसार ८९ हजार ९ क्विंटल विविध बियाणे लागले. यंदा १ लाख ८ हजार ९२३ क्विंटल बियाण्याची गरज लागण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये संकरित कपाशी बियाण्यांच्या १० लाख ५२ हजार बियाणे पाकिटांची गरज लागेल, तर सोयाबीनचे ९८,०७० क्विंटल बियाणे लागेल. आयुक्तालयाने १ लाख ८७ हजार १०० टन खतसाठा मंजूर केला आहे. त्यापैकी ११ हजार १४६ टन एप्रिल अखेर मंजूर केले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवावी. कृषी विभागाच्या विविध खात्यांकडून योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास त्यांचा त्रास कमी होईल. पंतप्रधान केवायसी योजनेअंतर्गत बीड जिल्ह्याची निवड झाली असून बँकांनी शेतकऱ्यांचे ऑनलाइन खाते उघडावे. असे न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करावेत.
दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com