Amaravati APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Market : विदर्भातील एकमेव रेशीम बाजारालाही टाळे

Vidarbha Sericulture : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विदर्भातील पहिल्या रेशीम बाजाराला अवघ्या सहा ते सात महिन्यांतच टाळे ठोकण्याची नामुष्की रेशीम संचलनालयावर आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विदर्भातील पहिल्या रेशीम बाजाराला अवघ्या सहा ते सात महिन्यांतच टाळे ठोकण्याची नामुष्की रेशीम संचलनालयावर आली आहे. दर्जेदार रेशीम कोशाची उपलब्धता नसणे, सोईसुविधांचा अभाव अशा विविध कारणांमुळे हे घडल्याचा आरोप होत आहे.

राज्यातील इतर भागांप्रमाणे या भागात उत्पादित कोशाला याच परिसरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता रेशीम संचालनालयाने पुढाकार घेत अमरावती येथे रेशीम बाजाराचा प्रस्ताव दिला होता. यामुळे रेशीम कोष उत्पादकांचा वाहतुकीवरील खर्च वाचेल या उद्देशाने व्यापारी सतीश बेतल यांनी देखील त्यासाठी पुढाकार घेतला.

अल्पावधीतच या दोघांच्या समन्वयातून रेशीम बाजार सुरू झाला. सुरुवातीला शेतकऱ्यांचा याला कमी प्रतिसाद होता. त्यानंतर तो वाढल्याने याच ठिकाणी कोशावर प्रक्रिया व्हावी याकरिता बडनेरा रेशीम पार्कमध्ये असलेली यंत्रणा सतीश बेतल यांनी भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरविले.

परंतु या ठिकाणी जुनी यंत्रणा असल्याने त्याच्या दुरुस्तीवरच ९ ते साडेनऊ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सतीश बेतल सांगतात. मात्र त्यानंतरही श्रम आणि वेळेत अपेक्षित धागा उत्पादनाचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे त्यांनी याचा नाद सोडला.

दरम्यान, इतर राज्यांतून देखील काही व्यापारी रेशीम कोष खरेदीसाठी बडनेरा परिसरात येत होते. रामनगरला असलेला दर या ठिकाणी मिळावा, अशी रेशीम कोष उत्पादकांची अपेक्षा होती.

परंतु कोषाचा दर्जा नसल्यामुळे हा दर व्यापाऱ्यांकडून दिला जात नव्हता. यामुळे देखील व्यापारी व रेशीम कोष उत्पादकांमध्ये गैरसमज वाढीस लागले, असेही सांगितले जाते. परिणाम कोष आवकेवर झाला. आवक होत नसल्याने व्यापारी देखील फिरकत नव्हते. प्रशासनाकडून अपेक्षित सोईसुविधा देखील पुरविण्यात आल्या नसल्याचे सांगितले जाते. अशा साऱ्या घटकांचा परिणाम होत हा बाजार बंद पडला. एकमेव रेशीम कोष बाजार अल्पावधीतच बंद पडल्याने रेशीम कोष उत्पादकांची मात्र पुरती निराशा झाली आहे.

रेशीम कोष खरेदीकरिता या जागेची उपलब्धता व्हावी याकरिता ठराव घेण्यात यावा. त्यानंतर या ठिकाणी शेड व तत्सम सुविधा उपलब्ध करून घेणे शक्‍य होते. सुविधा अभावी येथे कोष असल्यास उंदीर व तत्सम प्राण्यांकडून नुकसान होण्याची शक्‍यता होती. याबाबत सातत्याने अमरावती बाजार समितीकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही.
- सतीश बेतल, रेशीम कोष खरेदीदार, बडनेरा, अमरावती
खरेदीदारांमध्ये स्पर्धा व्हावी याकरिता नव्या व्यापाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. त्यातून कोष उत्पादकांना चांगला परतावा मिळणे शक्य होणार आहे. त्याकरिता बारामती भागातील व्यापाऱ्यांची देखील चर्चा सुरू आहे.
- दीपक विजयकर, सचिव, बाजार समिती अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT