Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh : शेतकऱ्यांच्या मुलांना मोठी संधी, ‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय

College of Dairy Technology : गोकुळ दूध उत्पादकांसह इतरांनाही गोकुळने प्रस्तावित केलेल्या पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा फायदा होणार आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभारणार आहे. यासाठी, शुक्रवारी (ता. ३०) होणाऱ्या संघाच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला सभासदांकडून मंजुरी घेतली जाणार आहे. या क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी ६० ते ८० जागा मिळू शकणार आहेत. देशात ५६ आणि महाराष्ट्रात ५ पशुवैद्यकीय कॉलेज असून, ‘गोकुळ’चा सहावा प्रस्ताव असणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली.

संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ दूध उत्पादकांसह इतरांनाही गोकुळने प्रस्तावित केलेल्या पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना जिल्ह्यातच याचे शिक्षण घेता येणार आहे. वार्षिक सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. याचे सभासदांकडून निश्‍चितपणे स्वागत केले जाईल.

राज्य शासनाने खासगी पशुवैद्यकीय कॉलेज काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार गोकुळने हा विषय सर्वसाधारण सभेतील अजेंड्यावर आणला आहे. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, शिरवळ, परभणी, उदगीर या ठिकाणी सध्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे. देशात सध्या ७५ हजार पशुवैद्यकांची गरज असताना सध्या केवळ ३६ हजारच पशुवैद्यक कार्यरत आहेत.

यावेळी पशुवैद्यकीयसह डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचीही परवानगी घेतली जाणार आहे. ‘गोकुळ’कडे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजीसाठी द्यावी लागणारी प्रात्यक्षिकाची सर्व यंत्रणा आधीपासून सज्ज आहे. याचा निश्‍चितपणे फायदा होणार आहे. जिल्ह्यात सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी या दोन्ही महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे नोकरी करण्याची संधीही मिळू शकते.

रिक्त जागा भरण्यास मदत

जिल्ह्यात ९५ शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ५० ते ५५ अधिकारीच आहेत. इतर पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुधनाला आरोग्य सेवा देणे कठीण होत आहे. गोकुळच्या प्रस्तावित महाविद्यालयामुळे रिक्त जागा भरण्यासही मोठी मदत होणार आहे.

महाविद्यालयासाठी ‘गोकुळ’कडे स्वत:ची जागा

कॉलेज करण्याबाबत प्रस्ताव मंजूर झाल्यास गोकुळ स्वत:च्या कात्यायनी येथील जागेचा विचार करू शकते. शहरापासून जवळ आणि विद्यार्थ्यांना सोयीचे ठरेल अशी जागा निवडावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांना घरकुलाबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत

Rover Machine Shortage : रोवर युनिटची संख्या वाढेना

Agrowon Podcast: सोयाबीनवरील दबाव कायम; मोहरीला चांगला उठाव, लाल मिरची टिकून, वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT