Cabinet Decision Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Cabinet Decision: बारामती, परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Government Approval: राज्यातील पशुपालक आणि कृषी क्षेत्रासाठी मोठी घोषणा झाली आहे. मंत्रिमंडळाने बारामती आणि परळी येथे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, यासाठी तब्बल 564.58 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Dhananjay Sanap

Pune News: राज्य सरकारने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २५) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित विविध ७ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पशुपालक आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेण्यात आला आहे. बारामती (पुणे) आणि परळी (बीड) येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 564.58 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय:

राज्य डेटा प्राधिकरण स्थापन होणार - महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता देण्यात आली असून, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

बारामती व परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालये - पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येकी 564.58 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात सुधारणा - महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1955 मध्ये सुधारणा करण्यात आली असून, महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता देण्यात आली आहे.

पौड (पुणे) येथे नवीन दिवाणी न्यायालय - मुळशी तालुक्यातील पौड येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठाणे जनता सहकारी बँकेत खाते उघडण्यास परवानगी - राज्यातील सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळांना ठाणे जनता सहकारी बँकेत खाते उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

1976 पूर्वी बाधित गावठाणांसाठी निधी मंजूर - 1976 पूर्वी पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित 332 गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी 599.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे पशुपालकांना आधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, महाराष्ट्राच्या कृषी आणि पायाभूत विकास क्षेत्राला गती मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT