Agriculture AI Project Baramati: बारामतीच्या एआय शेती प्रकल्पाची इलॉन मस्क यांनी घेतली दखल!

Elon Musk on AI: बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर सुरू केला आहे. या उपक्रमाची मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी दखल घेतल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनीही ‘एआय सर्व काही बदलू शकते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Elon Musk
Elon MuskAgrowon
Published on
Updated on

Baramati News : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर बारामतीस्थित ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड, बिल गेट्स फाउंडेशन यांच्या मदतीने प्रभावीपणे सुरू केला आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी या बाबतची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर अमेरिकेतील टेस्ला व स्पेस एक्स कंपनीचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनीही सोमवारी (ता.२४) त्याची स्वतःहून दखल घेत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्व काही बदलू शकते’, अशी प्रतिक्रिया ‘एक्स’वर व्यक्त केली आहे.

Elon Musk
Agriculture AI : भविष्यातील शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य आहे, ही बाब बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध कंपनीच्या मदतीने सिद्ध करून दाखविली आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी नुकतीच दिल्ली येथे या प्रकल्पाची दखल घेत भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवली होती. त्याची दखल इलॉन मस्क यांनी घेतली आहे.

Elon Musk
Agriculture AI : प्रतापराव पवार यांच्याकडून ३.५ कोटींची देणगी

याविषयी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य आहे, ही बाब ऊस पिकाच्या माध्यमातून ट्रस्टने सिद्ध केली आहे. संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, डॉ. अजित जावकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून हे यश मिळाले आहे. इलॉन मस्क यांनी याची दखल घेणे ही बाब आशादायक आहे.’’

कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झाला तर त्याचे सकारात्मक परिणाम जगभरातील कृषी क्षेत्रावर होतील, याची कल्पना इलॉन मस्क यांना असल्याने त्यांनी बारामतीतील प्रकल्पाची आपणहून दखल घेतली. यातून या प्रकल्पाला जागतिक मान्यताही मिळू लागल्याचे स्पष्ट होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातत्याने प्रशिक्षण व संशोधनासाठी प्रोत्साहन दिल्याने हे शक्य झाले. प्रकल्पाचे महत्त्व हळूहळू सर्वांना समजू लागले आहे.
प्रतापराव पवार, विश्वस्त, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com