Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetables Rate : भाजीपाला तेजीत तर फळभाज्या दरात घसरण, आठवडी बाजारात कोथींबीरची रेलचेल

sandeep Shirguppe

Vegetables Market Rate : उन्हाच्या तडाख्याने या आठवडा बाजारात अल्प प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आला. विशेषतः यात तांदळी, लालमाठ, पोकळा, मेथी या भाज्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसल्या, तर कोथिंबीर उत्पादन कमी होत असल्याने बाजारात आवक कमी दिसत होती. त्यामुळे तिचा दर ४० ते ५० रुपये पेंडी असा राहिला. उत्पादनच कमी झाल्याने पुढील आठवड्यातही भाजीपाल्याचे दर आणखी वाढू शकतात, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

गेले दोन आठवडे टोमॅटो दहा ते वीस रुपये प्रतिकिलो या दराप्रमाणे भाव होता. मात्र, या आठवड्यात टोमॅटोचा भाव २५ ते ३० रुपये प्रतिकिलो असा झाला.

भाजीपाला दर

मेथी २५ ते ३० रु. पेंडी, पालक २० रु. पेंडी, पोकळा २० रु. पेंडी, तांदळी १५ ते २० रु. पेंडी, पालक २० रु. पेंडी, लाल माठ १५ रु. पेंडी, कोथिंबीर ४० ते ५० रु. पेंडी, कोबी १० ते ३० रु. नग, फ्लॉवर गड्डा २५ ते ४० रु. नग.

फळभाज्यांचे दर

वांगी ४० ते ६० रु. किलो, दोडका ६० ते ८० रु. किलो, भेंडी ४० रु. किलो, ढब्बू ८० रू. किलो, गाजर ६० रु. किलो, हिरवा वाटाणा ८० ते १०० रु. किलो, गवारी ५० ते ६० रु. किलो, कारली ६० रु. किलो, बिनिस ६० रु. किलो, शेवगा १० रु. ३ नग, जवारी काकडी ६० रु. किलो, पांढरी काटेरी काकडी ४० ते ५० रु. किलो, घेवडा ८० रु. किलो, बीट १५ रु. नग, दुधी भोपळा १० ते ३० रु. नग, टोमॅटो २५ ते ३० रु. किलो, हिरवी मिरची ७० ते ८० रु. किलो

फळांचे दर

हापूस ३०० ते ४०० रु. डझन, पायरी ३५० ते ४५० रु. डझन, तोतापुरी १५ ते २५ रु. नग, सफरचंद (इराण) १५० ते १७० रु. किलो, सफरचंद (वॉशिंग्टन) २५० ते ३०० रु. किलो, चिकू ८० रु. किलो, सीताफळ १०० ते १२० रु. किलो, पपई ४० ते ६० रु. नग, पेरू १०० ते १२० रु. किलो, केळी ४० ते ६० रु. डझन, केळी (जवारी) ५० ते ८० रु. डझन

'शुगर फ्री जाम फळ' दाखल

उन्हाळा सुरू झाला की, कोकणचा मेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचतो. त्यात हापूस आंबा, पायरीसह जाम नावाचे फळही बाजारात अल्प प्रमाणात मिळते. त्याचीच एक सुधारित वाण सध्या 'शुगर फ्री जाम' नावाने कोल्हापूरात राजारामपुरीतील फळ विक्रेते यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. कोकण किनारपट्टीच्या ७२० किलोमीटरच्या पट्टयामध्ये पाणीदार व किंचित गोड असलेले हे फळ काही प्रमाणात स्थानिक बाजारात वाट्यांच्या स्वरूपात विक्रीसाठी येते. त्याला ग्राहकांकडून मागणी अधिक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT