Online Land Survey : जमीन मोजणीच्या ऑनलाइन कटकटीला शेतकरी वैतागले

Bhumi Abhilekh Department : शेत मोजणीच्या अर्जासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणे भूमी अभिलेख विभागाने बंद करून ऑनलाइन कार्यवाही सुरू केली आहे
Land Survey
Land SurveyAgrowon
Published on
Updated on

Karad News : शेत मोजणीच्या अर्जासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणे भूमी अभिलेख विभागाने बंद करून ऑनलाइन कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून महाई-सेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा लागत आहे. अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेकदा लॉगिन आयडी, पासवर्डच लक्षात राहत नाही, सर्व्हरच डाउन होण्यासह अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Land Survey
Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खटाव आणि काही प्रमाणात कऱ्हाड तालुक्यांत मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे मोजणीसाठी ऑनलाइन तारीख मिळाल्यावरही त्याच महिन्यात मोजणी होईल, याची खात्रीही राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी पुरते वैतागले आहेत.

आता ऑफलाइन अर्ज शेतकऱ्यांकडून स्वीकारले जात नाहीत. महा-ई सेवा केंद्रातून अर्ज भरावा लागतो. त्यासाठी सुमारे शंभर-दोनशे रुपयांपर्यंतचा खर्च येतो. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केल्याने पेपरलेस कामकाज होत आहे.

परंतु शेतकऱ्यांचा अर्ज करण्यासंबंधीचा खर्च वाढला आहे. महा-ई सेवा केंद्रात अनेकदा सर्व्हर साथ देत नाही. अनेकदा सर्व्हर मध्येच डाउन होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा अर्धा ते एक दिवस नुसता हा अर्ज अपलोड करण्यासाठी जातो. सर्व्हरसंदर्भात अनेकदा महा-ई सेवा केंद्राकडून तक्रारी करूनही त्यांची दखलच घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

भूमी अभिलेख विभागाकडे जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खटाव आणि काही प्रमाणात कऱ्हाड तालुक्यातील मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी अर्जाची पावती घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात जातात. पावती दाखविल्यानंतर मोजणी केव्हा होईल, हे कळावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Land Survey
Land Survey : पुरंदर, बारामतीत संगणकाद्वारे ई-मोजणी

वादावादीचे प्रसंग टळणार

मोजणीचा प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइनच मोजणीची ‘क’ प्रत मिळणार आहे. त्याचबरोबर मोजणीच्या प्रतीसह यापुढे हद्दीचे अक्षांश आणि रेखांक्ष मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात स्वतः हद्दीची खात्री करता येणार आहे. त्यामुळे त्यातून निर्माण होणारी वादावादी, मारामारीचे प्रसंग कमी होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांनी मोजणीसाठी ‘व्हर्जन-२’ अंतर्गत ११५.१२४.११०.३३:८०६९/ या साइटवरून अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. अर्ज भरल्यानंतर त्यांना ऑनलाइनच मोजणीची तारीख मिळते. अर्ज भरताना लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकला आहे. सर्व शेतकऱ्यांनी तो लिहून जपून ठेवावा. लवकरच ऑनलाइन पडलेल्या तारखेनुसार मोजणी होईल.
प्रवीण पवार, भूमी अभिलेख उपअधीक्षक, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com