Brinjal Market : मागणीच्या अभावी वांगी दर दबावात

Brinjal Rate : सरासरी ५०० ते ६०० रुपये क्‍विंटलचा दर
Brinjal
Brinjal Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर ः ‘‘लग्नसराईचा मुहूर्त नाही. त्यासह धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादाचेही आयोजन मे महिन्यात नसते. त्यामुळे वांग्यांना मागणी कमी झाली आहे. परिणामी दरही दबावात आले आहेत.’’ अशी माहिती महात्मा फुले व्यापारी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी दिली.

विदर्भातील अमरावती तसेच नागपूरच्या महात्मा फुले बाजारात सध्या वांग्यांना सरासरी ५०० ते ६०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला वांग्याचे दर चांगलेच तेजीत होते. १००० ते १२००, ८०० ते १३०००, १२००० ते २००० अशी तेजी वांगी दरात अनुभवली गेली. त्यानंतर मात्र मे महिन्यात गुरू-शुक्रचा लोप असल्यामुळे फार लग्नतिथी नाहीत. त्यासह धार्मिक कार्यात महाप्रसादाच्या जेवणात वांग्याची भाजी केली जाते.

अशाप्रकारचे आयोजनही या महिन्यात राहत नाही. परिणामी, वांग्यांना मागणी घटली असल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळेच वांगी दर दबावात असून, त्यात सातत्याने घसरण होत असल्याचे ते म्हणाले.

उत्पादकांची कोंडी
कळमना बाजार समितीत रोज वांग्यांची आवक २०० ते २५० क्‍विंटल अशी स्थिर आहे. मात्र सुरुवातीला असलेले दर आता मिळत नसल्याने उत्पादकांची कोंडी झाली आहे. सध्या वांग्यांना ४०० ते ५०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे.

Brinjal
Brinjal Crop : वांगी लागवड करताना या गोष्टी कराच!

अमरावतीत आवक कमी
अमरावती बाजारात नागपूरच्या तुलनेत आवक अवघी ८० क्‍विंटलची नोंदविण्यात आली आहे. आवक कमी असल्याने या ठिकाणी दर नागपूरच्या तुलनेत प्रतिक्‍विंटल १०० रुपयांनी अधिक आहेत. ५०० ते ६०० रुपये क्‍विंटलने अमरावती बाजारात वांग्यांचे व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com