Indian Agriculture: हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्लाप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी प्लास्टिक कागदाने झाकून साठवणूक करावी.. कापूसवेचणीकापूस पिकातील २० ते ३० टक्के बोंडे फुटल्यानंतर पहिली वेचणी करून घ्यावी. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने दुसरी व तिसरी वेचणी करावी. पावसाची उघडीप पाहून वेचणी करावी..तूरशेंगा भरण्याची अवस्थापिकात वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच अशी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाचा प्रसार कोळी या किडीमार्फत होते. कोळी नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.तूर पिकाच्या झाडांच्या खोडावर फायटोप्थोरा करपा रोगाचे चट्टे दिसून येताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.पूर्वहंगामी ऊसलागवड पूर्वतयारीपूर्व हंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान केली जाते. त्यासाठी पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी. रान बांधणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ५० गाड्या प्रमाणे जमिनीतून द्यावे.ऊस बेणे लागवडीपूर्वी ॲसिटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणात उसाच्या टिपऱ्या ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.लागवडीसाठी को-८६०३२, को-९४०१२, को-८०१४, फुले ०२६५ या वाणांची शिफारस आहे. पावसाची उघडीप पाहून व वाफसा आल्यानंतर लागवडीस सुरवात करावी..हरभराबागायती हरभरा पिकाची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान केल्यास चांगले उत्पादन येते.पेरणीकरिता विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज या वाणांची निवड करावी. हे वाण मर रोगास प्रतिकारक्षम आहेत..Crop Advisory: कृषी सल्ला ( राहुरी विभाग).खरीप हंगामातील सोयाबीन पीक निघाल्यानंतर मूळकुज व मानकुज या रोगांपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी ट्रायकोडर्मा हर्जियानम (१ टक्के डब्ल्यू. पी.) ६ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यानंतर रायझोबियम व पी.एस.बी. प्रत्येकी २५० ग्रॅम प्रमाणे प्रति १० किलो बियाणांस गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते.हरभऱ्यावरील घाटे अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारीचे बियाणे हरभरा बियाणामध्ये पेरणी करताना मिसळून पेरणी करावी. पावसाची उघडीप पाहून व वापसा आल्यानंतर पेरणीस सुरवात करावी..गहूगव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी.पेरणीसाठी वाणबागायती वेळेवर पेरणीकरिता : एनआयएडब्ल्यू ३०१ (त्र्यंबक), एनआयएडब्ल्यू ९१७ (तपोवन), एनआयडीडब्लू २९५ (गोदावरी)बागायती उशिरा पेरणीकरिता : एनआयएडब्ल्यू ३४, एकेएडब्ल्यू ४६२७जिरायती पेरणीकरिता: एन आय डी डब्ल्यू. १५ (पंचवटी), ए के डी डब्लू २९९७ (शरद)कमी पाण्यात पेरणीकरिता : निफाड ३४, एनआयएडब्ल्यू १४१५ (नेत्रावती)..रब्बी मकारब्बी मका पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना १० नोव्हेंबरपर्यंत करावी.बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणास २ ते २.५ ग्रॅम थायरम पेरणीपूर्वी लावावे. तसेच पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर वापरावे.पेरणीच्यावेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रति हेक्टर द्यावे. पावसाची उघडीप पाहून व वाफसा आल्यानंतर पेरणीस सुरवात करावी..कांदारांगडा कांदा लागवड ऑक्टोबर अखेरपूर्वी पूर्ण करावी. पावसाची उघडीप पाहून व वाफसा आल्यानंतर लागवडीस सुरवात करावी.लागवडीसाठी फुले समर्थ व एन-२-४-१ या वाणांचा वापर करावा.बियाण्यास अझोस्पिरिलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.०२४२६ २४३२३९(प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, राहुरी तथा प्रमुख, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.