Grafting Plants Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Grafting Technique : भाजीपाला कलम तंत्र ठरेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

Vegetable Crops : भाजीपाल्याची पिके ही आहारातील पोषकतेची ग्राहकांची गरज भागविणारी आणि त्याच वेळी कमी कालावधीमध्ये रोजच्या रोज मिळणारे उत्पन्न देऊन शेतकऱ्याला उत्पन्नाची शाश्‍वती देणारी पिके आहेत.

Team Agrowon

उज्ज्वला पलघडमल, योगेश भगुरे, निखिल देवरे

Grafting Plants : भाजीपाल्याची पिके ही आहारातील पोषकतेची ग्राहकांची गरज भागविणारी आणि त्याच वेळी कमी कालावधीमध्ये रोजच्या रोज मिळणारे उत्पन्न देऊन शेतकऱ्याला उत्पन्नाची शाश्‍वती देणारी पिके आहेत. मात्र गेल्या काळापासून भाजीपाल्याचे दर्जा व उत्पादन उत्पादन कधी किडी आणि रोगांमुळे तर कधी वातावरणातील बदलामुळे घसरत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. अशा स्थितीमध्ये भाजीपाल्यामध्येही कलम तंत्रज्ञानाचा वापर उपयोगी ठरू शकतो. हे कलम तंत्रज्ञान बहुतांश सर्व फळझाडांमध्ये आपल्याकडेही वापरले जाते. परदेशामध्ये अनेक भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. हे तंत्रज्ञान आपल्याकडेही वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हेच कलम तंत्रज्ञान भाजीपाला उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

कलम करण्याचे उद्देश :

आज भाजीपाल्याची गुणवत्ता कमी होण्यासाठी जैविक आणि अजैविक ताण हे मुख्यतः कारणीभूत असतात. त्यातील कीड आणि रोगांमुळे निर्माण होणारे जैविक ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकरी सातत्याने प्रयत्न करताना दिसतो. त्यासाठी कीडनाशकांच्या वापरापासून विविध एकात्मिक पद्धतींचा अवलंब करतो. अर्थात, बहुतांश शेतकरी एकात्मिक पीक संरक्षणाऐवजी फक्त रासायनिक कीडनाशकांचा वापर करतात. त्यातून त्यांच्या स्वतःसोबतच ग्राहकांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

त्यातच भाजीपाला पिकांमध्ये मातीतून येणाऱ्या रोगांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रोगप्रवण क्षेत्रांमध्ये तर रोग प्रतिकारक वाणांची निवड करणे हाच उत्तम पर्याय आहे. पण आपल्याला एखादी नेहमीचेच वाण घ्यायचे आहे, अशा वेळी आवश्यक तेवढी रोग प्रतिकारकता मिळविण्यासाठी कलम तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते.

काकडीवर्गीय पिकांच्या कुकुरबिटॅसी वंशावळीमध्ये काकडी, भोपळा, कलिंगड इ. या पिकामध्ये फ्युजारिअम विल्ट आणि सोलानेसी वंशावळीतील टोमॅटो, वांगी, मिरची इ. पिकामध्ये बॅक्टेरियल विल्टसारख्या रोगांना रोखण्यासाठी कलम तंत्र नक्कीच उपयोगी पडते.

या तंत्रामुळे कमी किंवा जास्त तापमानवाढीचा ताण सहन करण्यासाठी मदतही मिळते. रोपांची पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषणाची कार्यक्षमता वाढते. क्षारयुक्त मातीसाठी पिकांची सहनशीलता वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरते.

भाजीपाला पिकातील कलम तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला रूटस्टॉकसाठी गावठी किंवा जंगली रोपाची निवड केली जाते, तर सायन म्हणून संकरित वाणाची निवड केली जाते. हे संकरित वाण शेतकऱ्याने निवडलेले घेतले जाते. एकदा रुटस्टॉक आणि सायनची निवड झाली की कलम बांधण्याची पद्धत निवडली जाते. व्यापारी तत्त्वावरील कलमांसाठी क्लेफ्ट कलम, टॉप इन्सर्शन कलम, भेट कलम व पाचर कलम या विविध कलम पद्धतींचा उपयोग केला जातो.

फायदे

मातीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगांना ही रोपे प्रतिकारक्षम असतात.

कलम केलेले रोप सुत्रकृमींना बळी पडत नाही.

कलम तंत्रज्ञानामुळे फळांचा आकार, उत्पादन व गुणवत्ता सुधारते.

हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.

कलमाच्या भाजीपाला रोपांमध्ये पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होते. त्यामुळे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा अधिक होतो.

मर्यादा

कलम केलेले रोप किमतीने महाग पडते.

कधी कधी कलम केलेल्या रोपांची वाढ गरजेपेक्षा जास्त होते. त्यामुळे वाढ नियंत्रणासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागू शकतात.

रूटस्टॉक व सायनचा वाढीचा कालावधी वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या व्यवस्थापनावर पडू शकतो.

कलम तंत्रज्ञानामध्ये येणाऱ्या समस्या

भाजीपाला कलम करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असते.

रूटस्टॉक व सायनच्या बियाणे लागवडीचे नियोजन योग्य वेळी करावे लागते.

कलम भरण्यासाठी नियंत्रित वातावरणाच्या पॉलिहाउसची सुविधा आवश्यक असते.

कलमामध्ये बीजजनित रोगांचा प्रसार होण्याचा धोका टाळण्यासाठी पॉलिहाउसमधील निर्जंतुकतेसाठी विशेष काळजी घ्यावी लागते.

उज्ज्वला पलघडमल, ९६०४३६५०६५

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT