Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Vegetable : कोल्हापूर बाजारात पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली, दरात वाढ

Market Rate Vagegtable : मेथी, शेपू, पोकळा, पालक आदी भाज्यांचे दर २० ते ३० रुपये पेंडी असे वाढले आहेत. ज्या शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येतोय त्यांना चांगला दर मिळत आहे.

sandeep Shirguppe

Vegetables Rate Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने अनेक एकर शेतातील भाजीपाला कुजण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाजारातील आवक कमी झाली. यामुळे मेथी, शेपू, पोकळा, पालक आदी भाज्यांचे दर २० ते ३० रुपये पेंडी असे वाढले आहेत. ज्या शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येतोय त्यांना चांगला दर मिळत आहे. तर काही शेतकऱ्यांचा शेतमाल कुजल्याने मोठा फटका बसला आहे.

वांगी, कोबी, टोमॅटो, हिरवी मिरची, ढब्बू मिरची, कारले आदी फळभाज्यांचे दरही कडाडले आहेत. कित्येक दिवसांपासून परतीच्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक क्षेत्रात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे भाजी शेतातच कुजत आहे. त्याचा थेट परिणाम आवक कमी होण्यात झाली आहे.

बाजारात दोडका, भेंडी, दुधी भोपळा, पडवळ, घेवडा आदी फळभाज्यांचे दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलो असे राहिले. ओल्या भुईमुगाच्या शेगांची आवक वाढली असून, ६० ते ८० रुपये किलो असा भाव राहिला. रताळांनाही मागणी वाढली असून दरही ४० ते ६० रुपये असे कमी जास्त प्रमाणात राहिले.

भाजीपाल्याचे पेंडीचे दर रुपयांत असे

मेथी २० ते ३०, शेपू २०, कोथिंबीर १५ ते २०, पालक १०, कांदा, पात १५ ते २०, अंबाडा १०, चुका १० ते १५.

फळभाज्यांचे दर असे रूपयांत

फ्लॉवर १० ते ४०, दोडका ४० ते ५०, काकडी ४०, हिरवा टोमॅटो ३०, दुधी भोपळा नगानुसार १० ते ३०, पडवळ ४०, मका कणीस ५ ते ७ रु, तोंदली ३०, शेवगा १५ तीन नग, रताळी ४०, वांगी ६० ते ८०, ढब्बू मिरची ६० ते ७०, गवारी ८० ते ९०, हिरवी मिरची ६० ते ७०, टोमॅटो ५० ते ६०, बिनीस १२० ते १३०, बीट १० ते १५ रूपये नग, गाजर ४० रूपये किलो.

फळांचे किलोचे दर रूपयांमध्ये

पेरू ५० ते १००, मोसंबी ५० ते १००, संत्री ५० ते १००, सफरचंद ८० ते ३००, चिक्कू ५० ते ९०, सीताफळ ४० ते ६०, हनुमान फळ ४० ते ७०, अंजीर ८० ते १००, पपई १० ते ४० (आकारानुसार), ड्रॅगनफ्रूट १०० ते १५० रुपये किलो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Heavy Rain : पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Crop Compensation Scam : खातेदारांना दिली तुटपुंजी रक्कम अन् लाटला मलिदा

Crop Demonstration : पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करावेत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या

Agriculture Innovation: ‘एचटीबीटी’ला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करा

SCROLL FOR NEXT