Doctor Agrowon
ॲग्रो विशेष

Hospital Vacancy : रुग्णालयांतील रिक्त पदे भरणार

Rural Hospital Doctor Update : ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

Team Agrowon

Mumbai News : पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासह कुपोषणासारखे आजार कायमचे नष्ट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

टप्प्याटप्प्याने सर्व रुग्णालयांत डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. परिणामी उत्कृष्ट दर्जाची सेवा मिळू शकेल, त्यादृष्टीने आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी काम करण्याची जरुरी आहे, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

गंजाड आणि वणई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि निवासस्थान इमारतीचे उद्‍घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार विनोद निकोले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, माजी आमदार अमित घोडा, नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, सहायक जिल्हाधिकारी संजिता महापात्र, सभापती प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला उपस्थित होते.

गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथून तलासरी तालुक्यातील मौजे काजळी उपकेंद्र इमारत आणि पालघर येथील बी.पी.एच.यू. इमारतीचे आभासी पद्धतीने उद्‍घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाभरात १२५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्‍घाटनही करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व गाव-वाड्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे पसरले पाहिजे, याचा कृती आराखडा तयार करण्यात येऊन सरकारच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच निवासी इमारतींमध्ये सर्व निवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राहणे बंधनकारक आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.

आरोग्य सेवेसाठी डॉक्टर नेमणार!

जिल्ह्यातील केवळ आदिवासीच नाही, तर प्रत्येक व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयातदेखील डॉक्टरांची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करत असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT