Scientist of Agricultural Science Center Dr. Deepak Kachhave Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Input : सेंद्रिय निविष्ठाचा वापर करा : डॉ. कच्छवे

Dr. Deepak Kachhave : आगामी खरीप हंगामात पेरणीचे नियोजन केल्यास खरीप हंगाम यशस्वीपणे सुरू करता येईल. तसेच सेंद्रिय निविष्ठाचा वापर करून विषमुक्त अन्न तयार करणे काळाची गरज आहे,

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : आगामी खरीप हंगामात पेरणीचे नियोजन केल्यास खरीप हंगाम यशस्वीपणे सुरू करता येईल. तसेच सेंद्रिय निविष्ठाचा वापर करून विषमुक्त अन्न तयार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक कच्छवे यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ग्रामस्तरीय कार्यशाळा टोणगाव व लाडगाव या ठिकाणी रविवारी (ता. १९) कार्यशाळा घेण्यात आल्या, त्या प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी रोहिदास राठोड, कृषी पर्यवेक्षिका संगीता उकिर्डे तसेच कृषी सहाय्यक विजय बागल किशोर गायकवाड व व प्रगतशील शेतकरी तसेच बाबासाहेब कणाके, संतोष चौधरी, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकरी भरत आहेर, युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त लक्ष्मण आहेर, रवी गरड, सोमिनाथ सरोदे, बबन कणाकेसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

डॉ. कच्छवे म्हणाले, की आगामी खरीप हंगामाचे पेरणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये जमीन तयार करणे, पाण्याचे नियोजन करणे, पिकांची व वाणाची निवड करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी तूर, सोयाबीन, मूग इत्यादीचे दर्जेदार वाणाची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर बीज प्रक्रियांचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.

उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवले. हवामान बदलाच्या काळात रुंद वरंबा सरी यंत्राचा वापर करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याप्रसंगी कृषी सहाय्यक विजय बागल व किशोर गायकवाड यांनी बिज प्रक्रिया व घरचे बियाणे वापरतांना उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT