Cabinet Meeting : अतिवृष्टीग्रस्तांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाचा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Devendra Fadanvis : अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८ हजार कोटी रुपये वितरीत केले असून ४० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहचले आहेत. आत्तापर्यतचा निधी हा वेगवेगळ्या जिल्ह्यात गेला आहे. त्याचे कारण जशा यादी येतील तशी मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.