Use of Kaolin in Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Kaolin : उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी केओलिन

Article by Dr. Shivaji Thorat : केओलिनचा वापर प्रामुख्याने फवारणीद्वारे केला जातो. फवारणी केल्यानंतर पिकाच्या पानांवर तसेच फळांवर पातळ पांढरा थर तयार होतो. हा पांढऱ्या रंगाचा थर तीव्र सूर्यकिरणे पानांत किंवा फळांत जाऊ न देता तो वातावरणात परावर्तित करतो.

Team Agrowon

डॉ. शिवाजी थोरात

Use of Kaolin in Orchards : शेतीमध्ये केओलिनचा वापर प्रामुख्याने बाष्परोधक म्हणून मोठ्या प्रमाणात होतो. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर बाष्परोधकांच्या तुलनेत केओलिन जास्त परिणामकारक आहे. याचे उत्पादन वजनाने हलक्या असलेल्या विशिष्ट दगडापासून केले जाते.

कच्च्या केओलिनवर ५५० ते ६०० अंश सेल्सिअस तापमानामध्ये प्रक्रिया केली जाते. त्यानंतर निर्जंतुकरणाची प्रक्रिया करून त्यातील विषारी घटक वेगळे केले जातात. अशाप्रकारे शुद्ध स्वरूपातील केओलिन जनावरांच्या औषधात, पशुखाद्यात वापरले जाते. बाजारात उपलब्ध असलेले कच्चे केओलिन हे पिकांना हानिकारक ठरते. कारण यामध्ये लीड, अर्सेनिक यासारखे विषारी घटक असतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत प्रकाशाची तीव्रता जास्त प्रमाणात वाढलेली असते. तसेच जमिनीवरून उष्ण वारे वाहण्याचे प्रमाणही वाढलेले असते. त्याचा पिकांवर अनिष्ट परिणाम होतो. यामुळे फळांवर काळे डाग पडणे (यालाच सनबर्न असे म्हणतात), पाने करपणे, पिकाची वाढ खुंटणे, अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.

सामान्यपणे उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी असते. तसेच पिकाला दिलेले पाणी बाष्पोत्सर्जनाद्वारे उडून जाते. त्यामुळे पिके लवकर कोमेजतात. विशेषतः फेब्रुवारीनंतर उष्ण लाटा आणि वेगवान वारे यामुळे केळीची पाने फाटतात, करपतात. ड्रॅगनफ्रूट, द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्री, कलिंगड इत्यादी फळांवर काळे डाग पडतात. फळांची प्रत व दर्जा यावर अनिष्ट परिणाम होतो.

केओलिनचे कार्य :

पानांवरील प्रखर सूर्यप्रकाश वातावरणात परावर्तित करणे :

केओलिनची फवारणी केल्यानंतर पिकाच्या पानांवर तसेच फळांवर पातळ पांढरा थर तयार होतो. हा पांढऱ्या रंगाचा थर तीव्र सूर्यकिरणे पानांत किंवा फळांत जाऊ न देता तो वातावरणात परावर्तित करतो. यामुळे पानांतील पेशीद्रवाचे तापमान बाह्य वातावरणातील तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने कमी राहण्यास मदत होते.

पानांमधून होणारे बाष्पोत्सर्जन २५ ते ३० टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे कमी पाण्यातही पीक तग धरते.

फोटोसिन्थेसिस ही क्रिया सुलभ होते. त्यामुळे पेशी विभाजन सुद्धा वाढते.

पर्णछिद्रांची उघडझाप मर्यादित ठेवणे :

उन्हाळ्यात तापमान वाढेल तसे पानांवरील पर्णछिद्रांची उघडझाप कमी अधिक होते. तापमानात वाढ झाली की पर्णछिद्रे बंद होतात आणि कमी झाले की ती पुन्हा उघडतात. ही क्रिया केओलिनमुळे सुरळीत होण्यास मदत होते.

कीड-रोगांना प्रतिबंध :

केओलिनचा वापर केल्यानंतर पानांवर एक विशिष्ट प्रकारचा थर तयार होतो. हा थर पानाच्या आतील पेशी भोवती संरक्षक कवच म्हणून कार्य करते. त्यामुळे अनेक रसशोषक किडींना रसशोषण करण्यास प्रतिबंध होतो. तसेच अनेक रोगांचा प्रसार होण्यासाठी प्रतिबंध करते. त्यामुळे पिकांचे रोग व किडींपासूनही संरक्षण होते.

वापराचे प्रमाण :

केओलिनचा वापर प्रामुख्याने फवारणीद्वारे केला जातो. फवारणीसाठी ५ ते १० ग्रॅम केओलिन प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरता येते. उन्हाळ्यात कमीत कमी १० ते १५ दिवसांच्या अंतराने केओलिनची फवारणी करणे गरजेचे आहे.

संशोधनातील निष्कर्ष :

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथील डॉ. शर्मा व डॉ. दत्ता या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार केओलिनची डाळिंबावर दर १५ दिवसांनी ५ वेळा फवारणी केल्यास सनबर्न ४७ टक्क्यांनी कमी झाले. तर फळे तडकण्याचे प्रमाण देखील ४६ टक्क्यांनी कमी झाले. याशिवाय फळमाशीचा प्रादुर्भाव ५०.३

टक्क्यांनी तर बॅक्टरीयल ब्लाइटचा प्रादुर्भाव ४०.२ टक्क्यांनी कमी झालेला दिसून आला. तसेच फळाचा रंग व चकाकी येण्याचे प्रमाण १९.५ टक्क्यांनी तर रसाचे प्रमाण १६.२ टक्क्यांनी वाढले.

पोर्तुगीज संशोधक डॅनिश व बनीड्रो यांनी द्राक्ष पिकावर केलेल्या संशोधनानुसार केओलिनच्या वापरामुळे एकूण फेनॉलमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली. फ्लेनॉइड्सचे प्रमाण २४ टक्के, अॅन्थोसायनिन ३२ टक्के तर व्हिटॅमिन सी १२ टक्के नी वाढल्याचे दिसून आले.

पाकिस्तानमधील मुलतान कृषी विद्यापीठातील संशोधक मोहम्मद नाजीम यांनी कापूस पिकावर केओलिनचा वापर केल्यानंतर उत्पादनात १२.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. जस्मोनिक अॅसिडचे प्रमाण १०० पीपीएमने वाढले.

वरील संशोधनाच्या निष्कर्षावरून केओलिनचा वापर उन्हाळ्यामध्ये करणे गरजेचा आहे. दे दिसून येते. याशिवाय इतर हवामान स्थितीतही सर्वच पिकांमध्ये याचा वापर फायदेशीर ठरत असल्याचे स्पष्ट होते. केओलिनचा वापर पर्यावरणपूरक असल्याने मधमाशी तसेच इतर उपयुक्त कीटकांना हानिकारक नाही.

डॉ. शिवाजी थोरात, ९८५००८५८११

(सदस्य -इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन इन अॅग्रीकल्चर, लॉस एंजलिस-अमेरिका)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT