Buldhana News: आजच्या काळात ग्राहकांना रसायनमुक्त भाजीपाला, फळे, कडधान्ये, डाळी मिळाव्यात या उद्देशाने येथे ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकाराने सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र सुरू करण्यात आले..या विक्री केंद्राचे उद्घाटन पंचशील होमिओपॅथीचे अध्यक्ष दादासाहेब कवीश्वर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी बाबासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारीसुनील पवार, जैविक शेतीतज्ज्ञ तथा मार्गदर्शक कुवरसिंह मोहने, डिंगाबर महाले, शरद वसतकार,राजेश झापर्डे, जनार्दन हेंड पाटील, मनजितसिंग शिख उपस्थित होते..Organic Certification : पदवीधरांसाठी सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरण हे उभरते सेवाक्षेत्र .कंपनीचे अध्यक्ष भगवानराव बरडे यांनी मालविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. दर आठवड्याला गुरुवारी व रविवारी शेतकरी आपला माल येथे विक्रीसाठी आणतील. सूत्रसंचालन मयुर बरडे यांनी केले..Organic Food : सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी महानगरपालिकेतर्फे मिळणार जागा.आभार शीतल दुकानदार यांनी मानले. नामदेव जगताप, नागेश पाटील, पंकज राजे, प्रकाश मोरे, सिद्धांत देशमुख, अनिल मेहरे, संकेत कळसकार, राजेंद्र देशमुख, संध्या इंगळे, माणिकराव सातव, शुभांगी कोचुरे, ओमप्रकाश खत्री, विकास सावरकर, सचिन कोकाटे, विनायक महाले, भावेश रामसे, .योगेश पवार, वैष्णवी सांगे, कल्याणी चाकरे, जयेश जयलवाल आदींनी पुढाकार घेतला. या वेळी प्रमुख मान्यवरांनी आजच्या काळात सेंद्रिय शेतीमालाचे आरोग्याच्या दृष्टीने किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे पटवून दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.