Mango Pest Inspection : आंब्यावर फूलकिडींचा प्रादुर्भाव वाढताच, कृषी सहसंचालकासह पथक सिंधुदुर्गात दाखल

Mango Season : यासंदर्भात ‘ॲग्रोवन’मधून प्रादुर्भावाची दाहकता ठळकपणे मांडल्यानंतर कृषी विभाग सतर्क झाला असून कृषी विभागाचे सहसंचालक अकुंश माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देवगड आणि मालवण तालुक्यांतील आंबा बागांना भेटी देत निरीक्षण केले.
Mango Pest
Mango PestAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : फूलकिडीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे. यासंदर्भात ‘ॲग्रोवन’मधून प्रादुर्भावाची दाहकता ठळकपणे मांडल्यानंतर कृषी विभाग सतर्क झाला असून कृषी विभागाचे सहसंचालक अकुंश माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देवगड आणि मालवण तालुक्यांतील आंबा बागांना भेटी देत निरीक्षण केले.

याशिवाय देवगड येथील आंबा संशोधन उपकेंद्रात पूर्णवेळ कीटकशास्त्रज्ञांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा हंगाम या वर्षी फूलकिडींच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे संकटात आला आहे.

जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये अधिक प्रादुर्भाव जाणवत असला तरी वैभववाडी, कुडाळ तालुक्यांत देखील फूलकिडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. देवगड तालुक्यात फूलकिडींनी थैमान घातले आहे.

Mango Pest
Mango Crop : वाढत्या उष्णतेमुळे आंबा पीक अडचणीत

एका-एका आंब्याच्या फळांवर दोनशे ते तीनशे फूलकिडे दिसून येत आहे. उपलब्ध असलेली सर्वच कीटकनाशके निरुपयोगी ठरत असल्यामुळे आंबा बागायतदारांप्रमाणे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभाग हतबल आहे. फूलकिडींमुळे होणाऱ्या नुकसानीची दाहकता दर्शविणारे परिपूर्ण वृत्त ‘ॲग्रोवन’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी सहसंचालक अकुंश माने यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आंबा बागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना केल्या.

Mango Pest
Mango Pest : फुलकिडीने नुकसान झालेल्या आंबा बागांचे सर्व्हेक्षण करा

त्यानंतर कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी बागांमध्ये जाऊन विविध उपाययोजना सुचवीत आहेत. दरम्यान, श्री.माने यांच्या नेतृत्वाखालील पथक सिंधुदुर्गात दाखल झाले होते. पथकात दापोली विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. ई. शिनगारे, फळसंशोधन केंद्राचे कीटकशास्त्र डॉ. अजय मुंज, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे आदी होते.

या पथकाने देवगडमधील कुणकेश्वर, कातवण, कातवणेश्वर, मालवण तालुक्यांतील आचरा, पारगाव यांसह आणखी काही गावात आंबा बागांची पाहणी केली. आंबा बागांमध्ये वाढत असलेल्या फूलकिडींचा प्रादुर्भाव प्रचंड असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. हे पथक फूलकिडीच्या प्रादुर्भावासंदर्भातील अहवाल शासनाकडे देणार आहेत. विद्यापीठाने देवगड येथील आंबा संशोधन उपकेंद्रांत कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज हे यांची पूर्णवेळ नेमणूक केली आहे.

कृषी विभागाचे सहसंचालक अकुंश माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आंबा बागांची पाहणी केली असून, फूलकिडी संदर्भातील अहवाल येत्या दोन दिवसांत शासनाला देण्यात येणार आहे.
- कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी, देवगड,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com