Chhatrapati Sambhajinagar News: यंदाच्या हंगामात भारतीय कपास निगम लिमिटेडमार्फत (सीसीआय) पैठण तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे.आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण यांच्या कार्यक्षेत्रातील बालानगर तसेच पाचोड येथील जिनिंगवर एकूण ६ हजार ७४० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या खरेदीसाठी ३८० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून खरेदी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे..सध्या सीसीआयमार्फत किमान दर ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल तर कमाल दर ८ हजार ६० रुपये इतका आहे. या दरामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत आहे आणि बाजारातील दलालांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होत आहे. यावर्षी प्रथमच सीसीआयने कापूस खरेदीसाठी आधुनिक कपास किसान मोबाइल ॲप वापरत ऑनलाइन नोंदणी, पडताळणी व मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे..CCI Procurement: ‘सीसीआय’ची दररोज १ लाख गाठी कापूस खरेदी.या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना मध्यस्थांचा त्रास, अतिरिक्त कागदपत्रांची मागणी व वारंवार बाजार समितीत फेऱ्या मारण्याचा त्रास कमी होणार आहे. दरम्यान, अनेक नोंदणी दुबार अर्ज, चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्यामुळे अडकून आहेत. बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांनी सांगितले, की ऑनलाइन प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांना अडचणी येत असल्या तरी बाजार समिती त्यांना पूर्ण मदत करणार आहे. .प्रलंबित शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये. त्यांनी समितीशी संपर्क साधून योग्य कागदपत्रे त्वरित अपलोड करावीत. सीसीआयचे खरेदी केंद्र शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस विकला जाईपर्यंत सुरू राहील.’ शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करून खरेदी प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची १४ हजार ३७४ क्विंटल कापूस खरेदी.एकूण ॲप नोंदणी : ४,११६मंजूर शेतकरी : ७८०प्रलंबित नोंदणी : ३,३३६.नोंदणी करताना शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर २०२५-२६ चा पीकपेरा असलेला डिजिटल सातबारा, आधार कार्ड आणि लाइव्ह फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. याशिवाय मंजुरी मिळत नाही.- नितीन विखे, सचिव, बाजार समिती पैठण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.