Balasaheb Kakade Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : कांद्यासाठी ठिबकचा १०० टक्के वापर करा : काकडे

Balasaheb Kakade : कांदा पिकाचे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी मातृ कंदाच्या निवडीबरोबरच ठिबक सिंचनाचा १०० टक्के वापर करावा, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे यांनी केले.

Team Agrowon

Shrirampur News : कांदा पिकाचे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी मातृ कंदाच्या निवडीबरोबरच ठिबक सिंचनाचा १०० टक्के वापर करावा, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे यांनी केले.

रांजणगाव देवी (ता. नेवासे) येथे सकाळ-अॅग्रोवन व रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि.च्या संयुक्त विद्यमाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ''कांदा लागवड व रिवुलिस तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन'' या विषयावर आयोजित चर्चासत्र झाले.

कांदा पिकाचे अभ्यासक व कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे, रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, उत्तर आणि मध्य महाराष्ट्राचे व्यवस्थापक विजय घुगे, ज्ञानेश्वर पवार, डावखर एजन्सीचे संचालक ज्ञानेश्वर डावखर, सोपान पेहरे, पोपट जावळे, हरिभाऊ चौधरी, दत्तात्रय पेहरे, दत्तात्रय पंडित, अशोक पंडित, किरण कुऱ्हे, राजेंद्र पेहरे, अप्पासाहेब पेहरे, शरद वाकचौरे, पंकज अंबाडे, कारभारी कापसे यांच्यासह रांजणगाव देवी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काकडे म्हणाले, की कांदा लागवड करण्यापूर्वी मातृ कंदाची निवड करावी. हंगामानुसार कांदा बियाणाच्या जाती निवडाव्या. कीड व रोग नियंत्रणासाठी नैसर्गिक नियंत्रण (गहू, मकाच्या ओळी) अवश्य करावे. कांदा रोप गादी वाफ्यावर करावे. रासायनिक खते माती परीक्षण करूनच वापरावे. कांदा बियाणांवर बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. कांदा पीक घेण्याअगोदर हिरवळीच्या खताचा वापर करावा.

बियाण्याच्या जातीची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर राखावे. भर खताचे व जोर खताचे नियोजन करावे. एक डोळ्याचा कांदा बिजोत्पादनासाठी वापरावा. कांदा काढणीअगोदर बुरशीनाशकाची फवारणी करावी व नंतरच कांदा चाळीमध्ये साठवणूक करावी. कुजलेल्या शेणखताचा वापर आवश्यक आहे. जमिनीत वाफसा जास्त दिवस राखून ठेवणे.

रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे यांनी पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन याची माहिती देत कांदा पिकाच्या लागवडीसाठी ताशी कमी प्रवाहाचा व कमी अंतरावरच्या ठिबक प्रणालीची निवड केली पाहिजे. मातीचा प्रकार व आराखड्यानुसार ठिबकची निवड करावी.

रूंद वरंबा पद्धतीवर दुहेरी नळीचा वापर केला पाहिजे. ठिबक प्रणालीच्या वापरामुळे पिकामध्ये वापसा नियमित टिकून असतो. कांदा पिकाची लागवड झाल्यानंतर विद्राव्य खतांचा वापर केला पाहिजे, असे सांगून कंपनीची विविध उत्पादने व कंपनी सेवाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक ‘अॅग्रोवन’चे सिनियर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख व सचिन तवले यांनी केले. शिवराज लोणाळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT